Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


मोशीत घरात घुसून मारहाण करणाऱ्या सात जणांना अटक


Main News

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – माझ्या मुलाच्या मोबाईलवरून तुमची मुलगी का बोलत होती? याचा जाब विचारण्यास गेलेल्या एकाला सात जणांनी घरात घुसून लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करुन जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.२४) रात्री साडे नऊच्या सुमारास मोशीतील विनायकनगर, गल्ली क्रंमाक १ मध्ये घडली. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  

प्रमोद जयभारत मारडे (वय ४०, रा. विनायकनगर, बोराडेवाडी, मोशी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी मोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी आकाश अनिल चौधरी (वय १८), खुर्शिद मुर्तजा चौधरी (वय २८), मोइन हाफीजुल्ला चौधरी (वय १८), ईशाद शहाबुद्दिन शहा (वय १८), महंमद असिम महमद अरुण सैय्यद (वय १९), सैय्यद महमद अरुण (वय ४२) व सद्दाम मुर्तुजा चौधरी (वय २२, सर्व रा. मोशी) या सात जणांना अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारडे  व चौधरी कुटुंबीय एकमेकांचे शेजारी राहतात. शनिवारी मारडे यांच्या घरी त्यांचा मुलगा एकटाच होता. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या चौधरी कुटुंबातील एक मुलगी मारडे यांच्या घरात बसून त्यांच्याच मुलाच्या मोबाईलवरुन बोलत असल्याचे मारडे यांच्या निर्दशनास आले. याबाबत मारडे त्या मुलीच्या घरच्यांना जाब विचारण्यास गेले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सात जणांनी मारडे यांच्या घरात जाऊन त्यांच्या शेजाऱ्यासह मारडे यांना लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण करुन जखमी केले. मोशी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin