Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


शाहूनगर येथे कारच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार


Main News

भोसरी, दि. २६ (पीसीबी) - चिंचवडमधील शाहूनगर येथे योगा क्लाससाठी सकाळी जात असताना वेगवान स्विफ्ट कारची धडक बसून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी पावणे आठच्या सुमारास केएसबी चौकाजवळील शाहुनगर येथे झाला. 

या अपघातात अनिल बंडगर (वय ५०), नीलम बंडगर (वय ४५), या दोघांचा मृत्यू झाला आहे. ते चिखलीतील सिद्धिविनायक हाईट्समधील रहिवाशी आहेत. 

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी ३० फूट फरफटत गेली. या अपघातात दुचाकीवरील अनिल बनगर आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर स्विफ्टने डस्टर गाडीला धडक दिली. या अपघातात स्विफ्टचा चक्काचूर झाला असून चालकदेखील गंभीर जखमी झाला आहे.

बंडगर कुटूंब दररोज शाहूनगर येथे योगा साठी येतात. सोमवारी सकाळी चिखलीहुन फ्लायओव्हरवरून शाहूनगरच्या दिशेने वळण घेत असताना पिंपरीकडून चिखलीकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारची (एमएच १४, एफव्ही ८१) बंडगर यांच्या दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कार चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी केएसबी फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या ठिकाणी झालेल्या हा पहिलाच अपघात आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin