Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


तळवडेतील कॅनबे चौकात तरुणीचा धारदार हत्याराने खून


Main News

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – तळवडे येथे तरुणीच्या डोक्यावर आणि मानेवर अज्ञातांनी धारदार हत्याराने वार करुन निर्घुण खून केला असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२३) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास कॅनबे चौकात घडली आहे.

अंतरा देवानंद दास (वय २३, रा. पश्चिम बंगाल) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सत्येंद्र कृष्णा सिंपी (वय ३६, रा. रेल्वे गेट, दापोडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरा दास ही शुक्रवारी तळवडे येथील कॅनबे चौकातून सायंकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन इसमांनी तिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हत्याराने तिच्या डोक्यात व मानेवर जबर वार करण्यात आले. यामुळे अंतरा जागेवरच कोसळली. ही तरूणी रक्ताच्या थारोळ्यात कॅनबे चौकातच पडून होती. काही वेळाने त्या रस्त्याने जात असलेल्या सत्येंद्र सिंपी यांचे तिच्याकडे लक्ष गेले व त्याने अंतराला रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. देहुरोड पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin