Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन दिघीतील तरुणीशी जबरदस्तीने केला विवाह


Main News

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – दिघी येथील एका तरुणीशी आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने विवाह केल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि.१८) सकाळी दहाच्या सुमारास दिघी येथील टाटा कम्युनिकेशन गेट ते आळंदी दरम्यान घडली.
 
प्रतिक राजेंद्र शेलार (ता. शिरुर, जि. पुणे) आणि त्याचे इतर तीन मित्रांविरोधात एका महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबरदस्तीने लग्न केलेली तरूणी दिघी येथे राहते. प्रतिकने रविवारी तिला तिच्या कामाच्या ठिकाणावरुन बाहेर बोलवून घेतले. अापल्या लग्नासाठी तुझ्या आई-वडिलांची परवानगी घेवू असे सांगून त्याने व त्यांच्या इतर तीन मित्रांनी तरुणीला आळंदीत नेले. तेथे शेलार याने माझ्या सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या आई-वडिलांना मारुन टाकेन, अशी धमकी तरुणीला दिला. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न केले. दिघी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin