Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भोसरीत दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन तरुण ठार


Main News

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – भोसरी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. पहिला अपघात सोमवारी (दि.१९) उशीरा रात्री पावणे बाराच्या सुमारास भोसरी येथील रोशन गार्डन येथे झाला. तर दुसरा अपघात गुरुवारी (दि.२२) सायंकाळी चारच्या सुमारास भोसरी येथे पुणे-नाशिक रोडवर असलेल्या साईसागर हॉटेलसमोर झाला.
 
पहिल्या अपघातात अनिकेत रोहिदास केदारी (वय २१, रा.धावडेवस्ती, भोसरी), तर दुसऱ्या अपघातात ईश्वर प्रभैय्या स्वामी मठ (वय १८, भारत बेकरीजवळ आळंदी) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत केदारी हा सोमवारी (दि.१९) रात्री पावणे बारा वाजता भोसरी येथील रोशन गार्डनसमोरील रस्त्यावरून आपल्या दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी रस्त्यालगत असलेल्या दुभाजकाला दुचाकी धडकून त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात ईश्वर प्रभैय्या स्वामी हा दुचाकीवरुन जात असताना त्याला संभाजी शेषराव खेडकर (वय ४१, रा. मुंगुस वाडी, पाथर्डी, जि. अहमदनगर) या टेम्पो चालकाने जोरदार धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली आहे. भोसरी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin