Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


निगडी, भक्ती-शक्ती चौकातील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी


Main News

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराचा रविवारी (दि. २५) वर्धापनदिन आहे. यादिवशी बुद्धविहाराच्या समोरून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ४ वरील निगडी जकात नाका ते देहूरोडमधील सेंट्रल चौकापर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. परंतु, निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील अतिक्रमणांवर कारवाई केली तरच या रस्त्यावरील वाहतूक सुरळित होणार आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात कदम यांनी आयुक्त वाघमारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराचा रविवारी वर्धापनदिन आहे. यादिवशी सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यातून धम्म अनुयायी मोठ्या प्रमाणात बुद्धविहाराच्या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे बुद्धविहाराच्या समोर असलेल्या मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक ४ वर मोठी गर्दी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे यादिवशी सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत महामार्ग क्रमांक ४ वरील वाहतूक निगडी जकात नाका ते देहूरोड दरम्यानची वाहतूक निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून वळविण्यात येणार आहे. परंतु, भक्ती-शक्ती चौकातील अतिक्रमणांमुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळित होणार नाही. त्यामुळे येथील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin