Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भोसरी, गवळीमाथा येथे सख्ख्या भावांच्या कुटुंबामध्ये हाणामारी; दोन महिलांवर कोयत्याने वार


Main News

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – भोसरी, गवळीमाथा येथील गणेशनगर भागात राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबियांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये दोन महिलांवर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि.२१) रात्री साडेनऊच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील गणेशनगर झोपडपट्टी येथे घडली.

संगीता रंगनाथ माने (वय ३५) आणि भिमाबाई मारुती माने (वय ४५) (दोघे रा. गवळीमाथा, गणेशनगर झोपडपट्टी, भोसरी) असे कोयत्याने वार झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी महादेव मारुती माने (वय २९) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव माने व चंद्रकांत माने हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यात पहिल्यापासून कौटुंबिक वाद आहेत. नुकत्याच झालेल्या यल्लम्मा देवीच्या उत्सवावरुन त्यांच्यात खटके उडाले होते. त्याच कारणावरून बुधवारी रात्री त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. भांडणे सोडविण्यास गेलेल्या कुटुंबातील महिलांवर कोयत्याने वार करुन लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यात संगीता व भीमाबाई जबर जखमी झाल्या आहेत. दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin