Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


चिखलीत सख्ख्या भावावर गोळीबार करणाऱ्याला लातूर कारागृहातून अटक


Main News

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – सात महिन्यापूर्वी चिखलीत राहणाऱ्या सख्ख्या भावावर गावठी कट्ट्याने गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला पुणे पोलिसांनी लातूर कारागृहातून अटक केली आहे. एका गुन्ह्यात अटक करून त्याची लातूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
 
याप्रकरणी महेश श्रीपती भोसले (वय ३८, रा. मोरया सोसायटी, सुदर्शनगर, साने चौक, चिखली) यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून त्याचा भाऊ विष्णू भोसले आणि त्याचा साथीदार जमीर दिलावर शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश भोसले हे २८ मे २०१६ रोजी आपल्या मोटार सायकलवरुन चिखलीतील कोयनानगर भागातून जात होते. त्यावेळी तोंडाला मास्क लावून आलेल्या  दोघांनी त्यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडली होती. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करता असताना पोलिसांना महेश आणि त्यांचा सख्खा भाऊ विष्णू भोसले यांच्यात बऱ्याच वेळा खटके उडाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी विष्णूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो लातूर कारागृहात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी लातूर कारागृहात जाऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याचा मित्र जमीर दिलावर शेख (वय २१, रा. सिंकदरपुर, ता. जि. लातुर) याच्या सहाय्याने हा हल्ला केल्याचेही त्याने कबूल केले. पोलिस उपनिरीक्षक विलास पालांडे तपास करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin