Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


कुदळवाडीत आगीमध्ये २५ भंगाराची दुकाने जळून खाक; लाखोंचे नुकसान


Main News

भोसरी, दि. २० (पीसीबी) – चिखलीतील कुदळवाडी भागात असलेल्या भंगार दुकानांना सोमवारी (दि. १९) रात्री लागलेल्या आगीत जवळपास २५ भंगाराचे गोडाऊन जळून खाक झाले आहेत. पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका तसेच एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. त्यासाठी जवानांनी सुमारे ३० बंबांचा वापर केला. 

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान चिखली, कुदळवाडी परिसरातील भंगार दुकानांना आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यामध्ये भंगाराचे सुमारे २५ गोडाऊन जळून खाक झाले. या गोडाऊनमध्ये प्लास्टिक व लाकडी साहित्य होते. ही आग विझवण्यासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका तसेच एमआयडीसीच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते. ३० बंबांनी ही आग विझविली. चार ते पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग अटोक्यात आली. या आगाती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin