Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


दिघीत अल्पवयीन मुलीच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न


Main News

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – दिघी येथील एका अल्पवयीन मुलीच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. पूर्ववैमनस्यातून बुधवारी (दि. १४) हा प्रकार घडला. 
 
कांचन तुपे (वय १६, रा. दिघी गावठाण) असे जिवे मारण्याचा प्रयत्न झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी प्रतिक विलास वाळके (वय २५, रा. पराडेआळी, दिघी) याला अटक करण्यात आली आहे. कांचनची आई रुपाली तुपे (वय ३५) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुपे यांच्या मोठ्या मुलीने प्रतिक याच्या विरोधात यापूर्वी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याचा त्याला राग होता. त्यातून कांचनच्या अंगावर टाटा सफारी मोटार घालून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. कांचन बुधवारी दिघीतील नेहरू चौकातून जात असताना हा प्रकार घडला. परंतु, त्यात ती बचावली असून कांचनच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin