Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


कुदळवाडीतील प्रदूषण रोखण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी


Main News

भोसरी, दि. १६ (पीसीबी) - कुदळवाडी परिसर हा भंगार व्यावसायिकांनी व्यापलेला आहे. त्यामुळे याठिकाणी सर्वात जास्त प्रदूषण होत आहे. सातत्याने आगीच्या घटना घडतात. सध्या थंडी सुरु असल्याने प्लॅस्टीक, टायर, रबर याची शेकोटी पेटविण्याचे मोठे प्रमाण दिसून येत आहे. मात्र त्यामुळे हवेत प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्य़ाला विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यावर तत्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी महेशदादा लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आयुक्त दिनेश वाघमारे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, “कुदळवाडी परिसरातील प्रदूषणाची कोंडी आणि त्यामुळे होणारा नागरिकांना त्रास याबद्दल महापालिका प्रशासनाला वारंवार माहिती देण्यात आली आहे. भंगार आणि रबरमुळे उन्हाळ्यात मोठ्या आगीच्या घटना, पावसाळ्यात पाणी साचून डासांचे प्रमाण वाढल्याने साथीचे होणारे आजार, थंडीमध्ये शेकोटीसाठी प्लॅस्टीक आणि रबर जाळल्याने त्यापासून होणारे प्रदूषण यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्याकडे पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कुदळवाडीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin