Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भाचीसोबत प्रेमविवाह केलेल्या चिखलीतील युवकाचा मामाने केला खून


Main News

भोसरी, दि. १३ (पीसीबी) - भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून चिखलीतील एका युवकाचे आधी अपहरण आणि नंतर खून केल्याचे मंगळवारी उघडकीस आले आहे. 
 
सागर कवितके (रा. मोरेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सागरची पत्नी मोनिका कवितके (वय २१) हिने दोन दिवसांपूर्वी सागरचे अपहरण झाल्याची निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मोनिकाचा मामा सतीश ठोंबरे (रा. दत्तनगर, मोहननगर, पिंपरी) याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश ठोंबरे हे मोनिकाचे मामा आहेत. मोनिका आणि सागर यांनी प्रेमविवाह केला होता. त्याचा ठोंबरे यांच्या मनात राग होता. आठ दिवसांपूर्वी सागर याने दारू पिऊन ठोंबरेंना शिवीगाळ करून त्यांना  मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ठोंबरे यांनी सागरचे अपहरण केले होते. अहमदनगर जिल्ह्यात नेऊन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin