Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


जीवनावश्यक वस्तू वजनमाप करू मिळणे ग्राहकांचा हक्क – नगरसेविका सावळे


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – स्वस्त धान्य दुकानातील साखर, तांदुळ, रॉकेलसह इतर जीवनावश्यक वस्तू वजनमाप करून मिळणे हा प्रत्येक ग्राहकांचा हक्क आहे, असे प्रतिपादन नगरसेविका सीमा सावळे यांनी रविवारी (दि. ११) केले. 

भोसरी येथील खंडेवस्ती झोपडपट्टी वसाहतीमध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) संलग्न अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने जागरूक ग्राहक शिबीर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्ष संलग्न ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोटेक्शन कमिटीचे अध्यक्ष अजिज शेख, सामाजिक कार्यकर्ते अझहर खान, त्रिलोक्य बौद्ध सहायक दलाचे धम्ममित्र भीमराव तुरूकमारे, शेखलाल नदाफ, भारत खरात, दयानंद कोटमाळे आदी उपस्थित होते. 

नगरसेविका सावळे म्हणाल्या, “धान्य दुकानदारांना शासनामार्फत पुरवठा केले जाणारे धान्य, दुकानातील साठा, ग्राहक संख्या व पात्र ग्राहकांची संख्या याची माहिती दुकानासमोरील फलकावर लिहिणे बंधनकारक आहे. दुकानदारांकडून फसवणूक होत असल्याची शंका असेल, तर त्याविषयी ग्राहक समितीकडे तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येक ग्राहकाला आहे.”

अजिज शेख म्हणाले, “रेशन दुकानावरील वाढती फसवणूक ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे विद्यमान रेशन व्यवस्था बदलण्याची गरज आहे. स्थानिक महिलांच्या बचत गटांना रेशनचे परवाने देण्याची आवश्यकता आहे.”

भीमराव तुरूकमारे म्हणाले, “दैनंदिन जीवनात शाळा, महाविद्यालयातील प्रवेश असो, दवाखान्यातील रुग्णाची फसवणूक, सोने-चांदी खरेदी असो त्याबाबत तक्रार करावयाची असेल तर संघटनेचा आधार घ्यावा."

शिबीरासाठी शेषनारायण खंकाळे, जुनेद शेख, विमल गवळी, कविता सूर्यवंशी, कांता खरात, सुलोचना जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खरात यांनी केले. 
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin