Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


पिंपरी महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक पक्षांतराची लागणार कसोटी


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आता राजकीय पक्षांना जेमतेम महिला मिळणार आहे. उमेदवारांची निवड आणि इतर प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. इच्छुकांनी नव्या वर्षाच्या प्रारंभापासूनच जोरदार तयारी चालवली होती. काहींनी सरत्या वर्षात आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत नवा घरोबा केला. नाशिकमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने ४४ ते ४५ नगरसेवक पक्षांतर करून इतिहास घडविणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय पक्षांच्या सद्यःस्थितीचा घेतलेला कानोसा….

राष्ट्रवादी काँग्रेसची अस्तित्वाची लढाई

अभेद्य बालेकिल्ला म्हणून राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवडमधील सत्तेचे कोण अप्रूप राज्यभर दहा वर्षे टिकून होते. मधल्या काळात पवना आणि इंद्रायणीतून बरेच पाणी वाहून गेले अन् आज हीच राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल ८३ नगरसेवक निवडून देत पिंपरी-चिंचवडकरांनी अजित पवारांवर कमालीचा विश्वास टाकला होता. शहर झोपडपट्टीमुक्त करून दाखिवतो, असा शब्द देणाऱ्या अजित पवारांनी नंतर पिंपरी-चिंचवडला टपली मारली अन् अंतर्गत सुंदोपसुंदी आज पक्षाच्याच जीवावर उठली. राष्ट्रवादीचे ४० हून अधिक नगरसेवक पक्षातून बाहेर पडणार आहेत. त्यातील काही जण आधीच बाहेर पडले आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी उघडी पडली. तरीही अजितदादा महापालिकेत एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाल्या नसल्याचा डंका पिटला खरा; पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. आता राष्ट्रवादीला दोन अंकी मजल मारता आली तरी त्यांनी मोठे यश मिळविले असे होईल.


शत प्रतिशतच्या पवित्र्यात भाजप

सध्या सर्वाधिक चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहिले जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रुपाने प्रथमच कमळ फुलल्यापासून पक्षाचे हौसले बुलंद झाले होते. त्यानंतर पक्षाने आपले दार सताड उघडे केले अन् येईल त्याला प्रवेश देण्याचा सपाटा लावल्याने जेथे कधीही कमळ फुलणे शक्य नाही असे वाटत होते तेथे पक्ष पोहोचला आहे व रुजलाही आहे. राष्ट्रवादी हाच आपला मुख्य विरोधक राहणार हे हेरून भाजपाने राजकीय पेरणी केली. मसल पॉवरच्याबाबतीतही राष्ट्रवादीपेक्षा कमी नाही हा आत्मविश्वास भाजपमध्ये आला. त्याचमुळे राष्ट्रवादीची लचकेतोड करण्यापर्यंत भाजपची हिंमत गेली आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी “जो तो वांछिल तो तो लाहो” या वचनाआधारे काम करण्यास सुरुवात केल्याने पक्षाला सुगीचे दिवस येत चालले आहेत. शतप्रतिशतच्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. 

शहरात राष्ट्रवादीची घसरण होत असल्यामुळे भाजप पोकळी भरून काढण्यासाठी सज्ज होत असताना शिवसेनेनेही कंबर कसली आहे. शिवसेना थोडी निद्रिस्त असली तरी शहराच्या ठराविक भागात या पक्षाचा हक्काचा मतदार आहे. भाजपच्या आक्रमकतेचा शिवसेनेलाही फायदा होणार आहे. भाजपनंतर काही प्रमाणात राष्ट्रवादी व काँग्रेसचीही मंडळी शिवसेनेला प्राधान्य देत असल्याने शिवसेनेचे नेते खुशीत आहेत. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), बसपा, सपा, एमआयएम व इतर लहान पक्ष या निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार असल्या तरी त्यांचा प्रभाव अगदीच मर्यादित राहील. 

आरपीआय यावेळेस भाजपचा मित्रपक्ष राहणार असल्याने त्यांना त्याच कितपत फायदा होतो ते पहावयाचे. गेल्याखेपेस आरपीआय शिवसेनेसोबत होते. त्यांचा नेहमी एकाच जागेवर विजय होतो. यंदा भाजपच्या जोडीने त्यात थोडी भर पडू शकेल. राज्यात इतरत्र शिरकाव करू पाहणाऱ्या एमआयएमला यंदा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पडत्या काळात संधी मिळू शकते. बसपाला गेल्यावेळेसच राष्ट्रवादीने गिळंकृत केले होते. नंतर पक्षाची अवस्था आणखी बिकट झाली यंदा काही उमेदवार उभे करण्यापलीकडे फार काही हाती लागणार नाही असे दिसते. 

काँग्रेस अजूनही गळाठलेलीच!

भरवशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचा प्रत्यय काँग्रेसच्या बाबतीत खरा ठरत आहे. सुवर्णमयी काळातही काँग्रेस पक्ष ४६ जागांपुढे सरकला नव्हता. पुढे तर पक्षाची पार वाताहात झाली. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर पक्षही विस्कळीत झाला. अजितदादा पवार यांनी पक्षातील हवाच काढून घेतली. यंदा तर काँग्रेसच्या १४ पैकी एखाद दुसरा वगळता सर्वच नगरसेवकांनी इतर पक्षांचा आसरा घेतल्याने नव्या दमाचे उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. पूर्णत: आत्मविश्वास गमावल्याच्या स्थितीत काँग्रेस कितपत तग धरील हा मोठाच प्रश्न आहे.

एकेकाळी शहरावर कमालीचा प्रभाव असलेल्या काँग्रेसला गेल्या काही वर्षात लागलेली उतरती कळा थांबायला काही तयार नाही. दिल्ली ते गल्ली होत असलेल्या पिछेहाटीचा मार्ग प्रशस्त करणारीच स्थिती पक्षाची पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. नगरसेवकांनी संधीसाधूपणा चालविला असला तरी पक्षसंघटनाच इतकी विसविशीत झाली आहे की कोणी थांबायलाही तयार नाही. अनेक ठिकाणी पक्षाला उमेदवार मिळण्याची मारामार होणार आहे. Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin