Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू; विनापरवानगी होर्डिंग लावल्यास थेट गुन्हा


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अतिक्रमण विभागाने डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शहरात विनापरवानगी होर्डिंग लावल्यास थेट फौजदारी कारवाईही होऊ शकते. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 

तसे पाहिले तर यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या निकालानुसार शहरात अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स वा फलक लागल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, त्याकडे महापालिकेकडूनच कानाडोळा होत आहे. त्यामुळे होर्डिंग्जद्वारे शहर विद्रुपीकरणाचे प्रकार सर्रास सुरू होते. अलीकडेच तर राजकीय कार्यक्रमानिमित्ताने शहर अक्षरशः होर्डिंगच्या गराड्यात सापडूनही कारवाई होत नव्हती. 

मात्र, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यावर प्रशासनाने होर्डिंगची बाब गांभीर्याने घेतली आहे. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सहाही क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना होर्डिंग वा अन्य माध्यमातून होणाऱ्या अनधिकृत प्रचाराकडे लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत होर्डिंग लागल्यास त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून थेट गुन्हे दाखल केले जाऊ शकतात.

महापालिकेत आचारसंहिता कक्ष सुरू 
महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्याच्या प्रमुखपदी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील ४० दिवसांत शहरात कोणती उद्घाटने होणार नाहीत वा आचारसंहितेचा भंग होणार नाही, यादृष्टीने आचारसंहिता कक्षातील अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून असतील.

राजकीय पक्षांच्या शाखा फलकांकडे लक्ष 
राजकीय पक्षांच्या शाखा, विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी बसलेल्या कोनशिला व अन्य प्रचार होईल अशी शिल्पे झाकली जाणार आहेत. संबंधित राजकीय पक्ष किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची तजवीज केल्यास महापालिका कारवाई करणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin