Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव आणि लक्ष्मण जगतापांची ताकद विरूद्ध अजितदादांचा करिष्मा


Main News

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या ४६ वर्षांत सातत्याने काँग्रेस सत्तेत राहिली आहे. २००२ पासून गेली १५ वर्षे काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातीलच नव्हे तर नगरपालिका निवडणुकीतूनही राजकीय वातावरण बदलताना दिसत आहे. प्रत्येक कामातील भ्रष्टाचारामुळे आणि सिद्धही झाले असल्यामुळे राष्ट्रवादीच्या महापालिका कारभाराबद्दल जनतेत नाराजी वाढली आहे. दुसरीकडे गेल्या दीड, दोन वर्षात राज्यातील भाजप सरकारकडून शहरातील विकासाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागले आहेत. नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना “स्मार्ट सिटी” कागदावरून आता अंमलबजावणीपर्यंत आली आहे. त्यामुळे भाजपचा प्रभाव आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची ताकद विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा करिष्मा अशीच होण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक बुधवारी जाहीर झाल्यानंतर आता पुढील सत्तेचे आडाखे बांधणे सुरू झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सत्तेत आहे. काँग्रेस विरोधी पक्षात असले, तरी राष्ट्रवादीच्या सत्तेत सोबती आहे. पण या दोन्ही पक्षांनी गेल्या १५ वर्षांत आजवर कधीही आघाडी केली नाही. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजप-सेनेकडून युती झाली, नंतर तेही स्वतंत्र लढले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वाधिक मोठा पक्ष ठरला. भाजप आणि शिवसेनेला १५ च्या वर कधी जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या निकालात कोणाचा फरफॉर्मन्स कसा राहतो, हा बदलत्या राजकीय समीकरणात औत्सुक्याचा विषय आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत विकासकामे नियोजनद्ध करून देशातील एक पुढारलेले शहर करण्यात राष्ट्रवादीच्या सत्तेला जमले नाही. अगोदर रस्ता करायचा आणि नंतर ड्रेनेजसाठी तो खोदायचा अशा पध्दतीनेच सर्व बाबतीत कामे झाली आहेत. एकूण शहराचा विचार करून विकास करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार दिसला नाही. काही ठराविक भागातच विकासाची गंगा नेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाला. शरद पवार हे केंद्रात मंत्री असताना केंद्राच्या अनेक योजनेतून महापालिकेला निधी मिळाला. पण महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना त्याचे नियोजन करून उपयोग करून घेता आला नाही. फक्त या निधीतील सर्वाधिक वाटा आपणाला कसा मिळू शकेल, याचे नियोजन करून प्रकल्प राबविण्यात आले. ते योग्य की अयोग्य याची शहानिशा न करता निधी खर्चाला मंजुरी दिल्याने आज अनेक प्रकल्प अडचणीत आले आहेत. 

या प्रकल्पांमध्ये झालेला भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे जनतेत राष्ट्रवादीच्या कारभाराबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. दुसरीकडे लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही भाजप-सेनेची सत्ता आल्यानंतर स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली. आता तो कागदावरून अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. त्यातच शास्तीकराचा मुद्दाही भाजपने निकाली काढल्यामुळे लाखो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शहरात भाजपविषयी जनतेत चांगले वातावरण तयार झाले आहे. त्यातच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रवेशामुळेही भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. नोटाबंदीचा परिणाम नगरपालिका निवडणुकीत दिसला नाही. आता महापालिका निवडणुकीत किती दिसेल हाही मोठा प्रश्न आहे.

नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारचा प्रभाव नगरपालिका निवडणुकांनी दाखवून दिला आहे. तो पिंपरी-चिंचवडमध्येही दिसणार का? की अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक संपर्क आणि त्यांचा करिष्मा राष्ट्रवादीला तारणार याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीतून दिसणार आहे. शिवेनेची धुरा सध्या काँग्रेसमधून आलेले खासदार श्रीरंग बारणे आणि दुसरे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे आहे. हे दोघेही महापालिका निवडणूक आणि पक्ष संघटनेला कधीही गांभीर्याने घेत नसले, तरीही महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचेही राजकीय कौशल्य पणाला लागले आहे. स्वबळावर लढल्यास सेनेला मोठ्या ताकदीने लढावे लागेल, हे मात्र नक्की.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin