Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


..असा आहे पिंपरी महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. याच कालावधीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करता येईल. आलेल्या उमेदवारी अर्जांची ४ फेब्रुवारी रोजी छाननी होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. त्यानंतर २१ फेब्रुवारीला मतदान आणि २३ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यंदा आपला उमेदवारी अर्ज व शपथपत्रे ऑनलाइन भरावे लागणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संगणकप्रणाली विकसित केली आहे. आयोगाने तयार केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज व शपथपत्रे याची माहिती भरून प्रिंट काढावी लागणार आहे. ही प्रिंट निवडणूक आयोगाकडे सादर केल्यावर उमेदवारी अर्ज भरल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे.

उमेदवारांना २७ जानेवारी सकाळी अकरा वाजल्यापासून ते ३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येईल. त्याचप्रमाणे २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत प्रिंट काढलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल. २९ जानेवारी यादिवशी रविवार असूनही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची ४ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता छाननीला सुरुवात होईल. छाननीत अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी त्याचदिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. निवडणूक रिंगणातील उमेदवारांची प्रभागनिहाय यादी याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. २८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin