Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


मंगलाताई मुलांच्या डोक्यावरचे केस गेले आता तरी त्यांना नगरसेवक करा; खाडेंचे प्रतिआव्हान


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू यापूर्वी नगरसेवक होते. तसेच त्यांचे दुसरे बंधू राजेंद्र जगताप व नवनाथ जगताप हे सुद्धा विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांची काळजी सोडून तुमच्या मुलांच्या डोक्यावरचे केस उडाले आहेत आता तरी त्यांना महापालिकेत निवडून आणा, असे प्रतिआव्हान भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम यांना दिले आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना त्यांच्या तीन बंधूंना तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आणण्याचे आव्हान दिले होते. त्याला भाजपचे माजी शहराध्यक्ष खाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिआव्हान दिले आहे.

सदाशिव खाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे यापूर्वी नगरसेवक होते. मात्र आमदार असूनही लक्ष्मण जगताप यांनी २०१२ च्या निवडणुकीत आपल्या बंधूला थांबविले होते. आमदार जगताप यांचे दुसरे बंधू राजेंद्र जगताप आणि नवनाथ जगताप हे विद्यमान नगरसेवक आहेत. परंतु, महापालिका निवडणुकीत पराभव होण्याच्या भितीने सैरभैर झालेल्या राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम यांना जगताप बंधू नगरसेवक आहेत, याचा कदाचित विसर पडलेला आहे. या सर्वांऐवजी मंगला कदम यांनी आपल्या मुलांची अधिक काळजी करण्याची आवश्यकता आहे.

नगरसेवक होण्याच्या काळजीने मंगला कदम यांच्या मुलांचे डोक्यावरचे केस उडाले आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी आपल्या मुलांना निवडून आणून त्यांची इच्छा पुरी करावी. २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. मात्र मंगला कदम यांच्या मुलाचा जनतेने दारूण पराभव केला. त्याचे त्यांनी पाच वर्षात आत्मपरीक्षण केलेले दिसत नाही. उलट पक्षनेतेपदाचा वापर केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी व सहकारी नगरसेवकांना त्रास देण्यासाठीच त्यांनी केला आहे, हे लपून राहिलेले नाही. त्यांनी सभागृहात नगरसेविकांची मुस्कटदाबी केली. त्यांना आपल्या प्रभागातील जनतेच्या समस्या मांडण्यापासून रोखले. त्याचेच परिणाम आता त्यांना आणि पक्षालाही भोगावे लागत आहेत.

मंगला कदम यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाचे अनेक नगरसेवक इतर पक्षात जातील, असे राष्ट्रवादीच्याच एका मागासवर्गीय नगरसेविकेने पत्रकार परिषदेत भाकित वर्तविले होते. ते आता खरे ठरत असल्यामुळेच मंगला कदम यांचा तिळपापड झालेला दिसत आहे. भाजपच्या वाढत्या राजकीय ताकदीमुळे आपण कोणत्या प्रभागातून लढायचे आहे, हे मंगला कदम यांना अजून निश्चित करता येत नाही. दुसरीकडे पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्यांना डावलून मुलाला नगरसेवक करण्याचेही स्वप्न त्या पाहत आहेत. त्यासाठी एखाद्या मोठ्या नेत्यावर आपण आरोप केल्यास आपणही मोठे होऊ, अशा भ्रमात त्या वावरत आहेत. मात्र निवडणुकीच्या मैदानात मंगला कदम आणि त्यांचा मुलगा दोघेही उतरल्यास भाजप त्यांना यंदा चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin