Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


पाच वर्षांत सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी सभागृह गाजविले; २९ नगरसेवकांनी विचारले लेखी प्रश्न


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या नगरसेवकांनी सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली, याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वसाधारण सभांमध्ये फक्त २९ नगरसेवकांनी लेखी प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये नगरसेविका सीमा सावळे, भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, आर. एस. कुमार आणि प्रथमच निवडून आलेले राजेंद्र जगताप, आशा शेंडगे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. नगरसेविका सीमा सावळे यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या अधिकारांचा वापर करून अनेक चुकीच्या कामांना सभागृहात कडाडून विरोध करून सत्ताधारी राष्ट्रवादीला घाम फोडल्याचे सभागृहातील चित्र होते. त्यांना नगरसेविका आशा शेंडगे यांनीही तेवढ्याच ताकदीने साथ दिल्याचे शहराने पाहिले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते विलास कुटे यांनी पाच वर्षात कोणत्या नगरसेवकाने किती लेखी प्रश्न विचारले आहेत, याची माहिती महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. त्यामध्ये ही बाब उघड झाली आहे. महापालिकेत निवडून आलेले १२८ आणि स्वीकृत पाच असे १३३ नगरसेवक आहेत. यापैकी २९ नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात महापालिका सभेत प्रशासनाला लेखी प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये प्रथमच निवडून आलेल्या १३ नगरसेवकांचा समावेश आहे. 

भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, आर. एस. कुमार, राजेंद्र जगताप आणि महिलांमधून नगरसेविका सीमा सावळे, अश्विनी चिंचवडे यांनी प्रत्येकी तीन लेखी प्रश्न विचारले आहेत. श्रीरंग बारणे, वर्षा मडिगेरी, चंद्रकांता सोनकांबळे आणि कैलास कदम यांनी तर नव्या सदस्यांपैकी विनोद नढे यांनी दोन लेखी प्रश्न विचारले आहेत. महेश लांडगे, शमीम पठाण, प्रशांत शितोळे,  तानाजी खाडे, सुलभा उबाळे, उल्हास शेट्टी, जावेद शेख, राहुल भोसले, विनया तापकीर, जयश्री गावडे, गीता मंचरकर, अनंत कोऱ्हाळे,  किरण मोटे, माया बारणे, अरुण बोऱ्हाडे, सुरेश म्हेत्रे, आशा शेंडगे, शीतल शिंदे यांनी प्रत्येकी एक लेखी प्रश्न प्रशासनाला विचारले आहेत. उर्वरीत ९९  नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात एकही लेखी प्रश्न विचारलेला नाही. 

नगरसेविका सीमा सावळे यांनी पाच वर्षांत सर्वसाधारण सभेत सर्वाधिक उत्तम कामगिरी केली आहे. महिला असूनही त्यांनी पदाचा योग्य उपयोग करून सत्ताधारी राष्ट्रवादीचे चुकीचा कारभार सभागृहात चव्हाट्यावर आणला. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला एकाकी झुंज देऊन त्यांनी करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची लूट थांबविली आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढल्यामुळे सावळे यांना अनेकदा राष्ट्रवादीने टार्गेटही केल्याचे शहराने पाहिले. सावळे यांना तेवढ्याच ताकदीने साथ देत नगरसेविका आशा शेंडगे यांनीही राष्ट्रवादीचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची कामगिरी केल्याचे सभागृहातील चित्र होते. 

देशाच्या वर्तमान परिस्थितीत सजग, सुज्ञ आणि विचारी नागरिकांचा देश विकासाच्या भूमिकेत महत्त्वाचा वाटा उचलण्याची गरज आहे. त्यामुळे याचा विचार करता पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त प्रमाणात मतदान करुन सुशिक्षित आणि जनतेशी बांधिलकी असणारे उमेदवार निवडून द्यावेत, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते विलास कुटे यांनी केले आहे.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin