Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


महापालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान; २३ फेब्रुवारीला मतमोजणी


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड व पुणेसह राज्यातील दहा नगरपालिका आणि २६ जिल्हापरिषदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. ११) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महापालिकांसाठी येत्या  २१ फेब्रुवारी रोजी, तर जिल्हा परिषदांसाठी १६ आणि २१ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड व पुणेसह संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने राज्यातील दहा नगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी केली. दहा महापालिकांमध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूरचा समावेश आहे. मुंबई वगळता उर्वरित नऊ महापालिकांची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका १६ आणि २१ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी सर्वांची मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज व शपथपत्रे दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संगणकप्रणाली विकसित केली आहे. आयोगाने तयार केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज व शपथपत्रे याची माहिती भरून प्रिंट काढावी लागणार आहे. ही प्रिंट निवडणूक आयोगाकडे सादर केल्यावर उमेदवारी अर्ज भरल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी राखीव प्रभागातून उमेदवारी भरणाऱ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास त्याची पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात विकासाची कोणतीही नवी कामे करता येणार नाहीत. पूर्ण झालेल्या योजनांची उद्घाटने राजकीय नेत्यांना करता येणार नाहीत. तसेच राजकीय पुढाऱ्यांना मतदारांवर प्रभाव पडेल, अशा घोषणा करता येणार नाहीत. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात व्हाव्यात यासाठी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना आयोगाने केली आहे.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin