Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


भविष्यात पोलिस तक्रार करतानाही लागणार आधार कार्ड


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – भविष्यात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवतानाही आधार कार्ड बंधनकारक होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सर्व सरकारी सुविधा, सेवा, अनुदान आणि लाभ घेणाऱ्यांना आधार कार्ड बंधनकारक करण्याची तयारी सुरु केली आहे.

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटवर सूट देताना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि ईपीएफसाठी आधार कार्ड बंधनकारक केले होते. आता लवकरच केंद्र सरकार सर्व प्रकारच्या सरकारी सेवांसाठी ओळखपत्र म्हणून आधार बंधनकारक करण्याच्या विचारात आहे.

संसदेत मंजूर केलेल्या आधार कार्ड विधेयेकानुसार कोणतेही अनुदान, लाभ किंवा सेवेसाठी भारत सरकारच्या निधीतून खर्च होत असल्यास त्यासाठी आधार कार्ड बंधनकारक असणार आहे. आधार कार्डचे फायदे लक्षात घेता प्रत्येक विभागाला आधार कार्डचा वापर करावा लागेल. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल तर तो व्यक्ती नेमका कोण आहे हे जाणून घेण्याची गरज नाही का असा प्रश्नही एका अधिकाऱ्याने उपस्थित केला.

आधार योजनेच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या प्रकरणांची सुनावणी जलदगतीने करण्यास नकार देतानाच या योजनेसाठी खासगी संस्थांनी माहिती गोळा करण्याची कल्पना चांगली नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच स्पष्ट केले होते. खासगी संस्था बायोंमेट्रिक डेटा गोळा करत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या असून आधारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin