Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


पिंपळेसौदागर, साई चौकात होणार दोन समांतर उड्डाणपूल; राज्यमंत्री कांबळे यांच्या हस्ते भूमीपूजन


Main News

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपळेसौदागर येथे सांगवी ते रावेत बीआरटी रस्त्यावर साई चौकात उभारण्यात येणाऱ्या समांतर दोन उड्डाणपुलाच्या कामाचे भूमीपूजन राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत सुमारे ३४ कोटी रुपये खर्च करून हे दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. हे उड्डाणपूल ६९५ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असणार आहेत. या दोन्ही उड्डाणपुलामुळे सांगवी ते रावेत बीआरटीएस रस्त्यावर साई चौकात होणारी वाहतूककोंडी कमी होणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी आणि मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी दोन स्वतंत्र उड्डाणपूल होणार असल्यामुळे विनाअडथळा थेट प्रवास करता येणार आहे. तसेच पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, सांगवी या भागातून हिंजवडीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची या चौकातील वाहतूककोंडीतून कायमची सुटका होणार आहे. 

दोन वर्षात या दोन्ही उड्डाणपुलाचे काम होणे अपेक्षित आहे. या उड्डाणपुलांच्या कामाचा संबंधित ठेकेदाराला २ जानेवारी रोजी कामाचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या उड्डाणपुलांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके, नगरसेवक शत्रुघ्न काटे, विनायक गायकवाड, नगरसेविका आरती चोंधे, संदिप कस्पटे, सुरेश वाडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin