Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


वायसीएमसाठी ७० लाखांची मशीन पावणे तीन कोटींना खरेदी; राष्ट्रवादी एसीबीच्या जाळ्यात


Main News

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासाठी बाजारात ७० लाखांना मिळणारे हायपर बोलिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) मशीन २ कोटी ७८ लाख रुपयांना खरेदी प्रकरणाची आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात महापालिकेची तत्कालीन तीन डॉक्टर, स्थायी समिती आणि राष्ट्रवादीच्या एका माजी महापौरांनी संगनमताने करदात्या नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांवर हात साफ केला आहे. राज्यात सत्तेत असताना राष्ट्रवादीने हे प्रकरण दडपले आणि महापालिका सभागृहात दोषी अधिकाऱ्याला पाठीशी घातले. आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीचे धाबे दणाणले आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासाठी आवश्यकता नसताना ७० लाख रुपयांचे एचबीओटी मशीन २ कोटी ७९ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. महापालिकेच्या चौकशीत ही मशीन खरेदी करताना कोणतेच नियम पाळले नसल्याचे समोर आले. मशीन बाहेरून मागविल्याचे दाखविले असतानाही त्यावर जकातकर भरला नसल्याचेही सिद्ध झाले. 

या प्रकरणात वायसीएम रुग्णालयाचे तत्कालिन अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे हे दोषी आढळले. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवून त्यांच्या निवृत्ती वेतनातील २० टक्के रक्कम कपात करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. मात्र राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल, प्रशांत शितोळे व मंगला कदम यांनी डॉ. जगदाळे हे किती प्रामाणिक अधिकारी आहेत, याचा पाढा वाचून सभेत त्यांची पाठराखण केली. तसेच शितोळे यांनी डॉ. जगदाळे यांच्या निवृत्ती वेतनातील केवळ १० टक्के रक्कम कपात करण्याची सभेत उपसूचना मांडली. ती राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर मंजूर केली. त्यावेळी विरोधकांनी उपसूचनेवर केलेल्या मतदानाच्या मागणीकडे राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले. 

त्यानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीने सभेत घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यामुळे या खरेदीतील भ्रष्टाचाराला आमदार अजित पवार यांचीच साथ असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. वास्तविक करदात्यांचे कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याकडून त्याची सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादीने वसुली करणे गरजेचे होते. मात्र राष्ट्रवादीने तसे न करता अधिकाऱ्यालाच पाठीशी घालून शहरातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. धक्कादायक बाब म्हणजे आमदार अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयाचे समर्थन करून एकप्रकारे भ्रष्टाचार करण्यासाठी प्रोत्साहनच दिले. एवढे करूनही आजही एचबीओटी मशीन धुळखात पडून आहे. त्याच्या देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले जात आहेत.

या प्रकरणावर प्रसारमाध्यमांनी आणि नगरसेविका सीमा सावळे यांनी सातत्याने आवाज उठविल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एचबीओटी मशीन खरेदीची गोपनीय चौकशी केली. खरेदीत भ्रष्टाचार दिसून आल्यामुळे त्याचा अहवाल या विभागाच्या महासंचालकांकडे पाठविण्यात आला. तसेच या प्रकरणातील संबंधितांची चौकशी करण्याची परवानगी त्यांच्याकडे मागण्यात आली होती. महासंचालकांनी सर्व प्रकरण पाहिल्यानंतर करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांवर दरोडा टाकणाऱ्यांची चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. आता या प्रकरणात डॉ. आनंद जगदाळे यांच्यासह अन्य अधिकारी, स्थायी समितीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या एका माजी महापौराची चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत.    

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin