Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीसाठी मुख्यमंत्री आग्रही


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती करा, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या निवासस्थानी काल (सोमवार) रात्री उशिरा विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत युतीसंदर्भात भाजपचे सर्व पालकमंत्री आणि संघटन मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली.


आगामी दहा महापालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तातडीची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. शिवसेनेशी कटुता न येता युती करावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडली. विशेषत: जिल्हापरिषदेत युती करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

काही जिल्हा परिषद वगळता भाजप किंवा युतीला निवडणुकांमध्ये फारसे यश कधीच मिळाले नाही. सध्या भाजपसाठी वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जिल्हा परिषद ताब्यात याव्यात, यासाठी युती करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे. तसेच अशीच भूमिका महापालिका निवडणुकांमध्ये घेण्याचा विचारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात भाजप आणि शिवसेनेमध्ये अजूनही प्राथमिक बैठक झालेली नाही. त्यामुळे कोण पुढाकार घेते, युतीचा आग्रह कोणाकडून केला जातो, जागावाटप कसे केले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin