Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


महापालिका निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखविणे पडणार महागात


Main News

पिंपरी, दि. १० (पीसीबी) - महापालिका निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखवणे उमेदवारांना महागात पडणार आहे. आचारसंहितेपासून निकाल प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार यांच्यावर व्हिडीओ कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. 


निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी पैसे, भेटवस्तू देण्याचे प्रकार घडतात. तसेच काही मतदारसंघात बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला जातो. संवेदनशील मतदारसंघात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. या प्रकारांना अटकाव करण्यासाठी निवडणूक प्रचार फेऱ्या, राजकीय सभा आणि मतदान व निकाल प्रक्रियेचे व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे चित्रण केले जाणार आहे.

त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी व्हिडीओ कॅमेरे भाड्याने घेतले जाणार असून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासाठी कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. व्हिडीओ कॅमेरे चालक आणि त्यांचे वाहन मिळून एकत्रित पैसे महापालिका संबंधित कॅमेरा पुरवठादारांना देणार आहे.

महापालिकेच्या मागील तीन निवडणुकीत ५० ते ६० टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत दहा टक्के मतदानवाढ व्हावी यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मतदार जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी विविध ठिकाणी जाहीरातही केली जाणार आहे.

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin