Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


आझम पानसरेंच्या प्रवेशामुळे महापालिकेत कमळ फुलवण्याचे स्वप्न साकार होणार – आमदार जगताप


Main News

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याचे स्वप्न आम्ही सर्वांनी पाहिले आहे. आझम पानसरे हे आमचे जुने साथीदार आमच्यासोबत आल्यामुळे हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. ९) व्यक्त केला. गतकाळात आम्हा दोघांकडून काही चुका झाल्या असून, त्या दुरूस्त करत शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचेही त्यांनी सांगितले. 


राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री उशिरा हा प्रवेश सोहळा पार पडला. त्याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार जगताप यांनी पत्रकार परिषद बोलावून माहिती दिली. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, बाबू नायर, प्रमोद निसळ, कुलकर्णी, राजेश पिल्ले, सदाशिव खाडे, उमा खापरे आदी उपस्थित होते. 

आमदार जगताप म्हणाले, “आझम पानसरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची सतत्याने चर्चा होती. अखेर त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने महापालिकेत सत्ता आणण्यासाठी आम्हाला आणखी एक साथीदार लाभला आहे. त्यांच्या प्रवेशासाठी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे व मी एकत्रितपणे प्रयत्न केले. पानसरे हे आमच्यासोबत मुंबईत असतील, असा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. महापालिकेत कमळ फुलविण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. महापालिका निवडणुकीत १०० नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. पक्षात नवीन-जुना असा भेदभाव न करता सर्वजण एकत्रपणे काम करू. निवडणूक जिंकू शकतील, अशांनाच भाजपची उमेद्वारी असेल. आमची ताकद वाढली म्हणून शिवसेनेला एकटे सोडणार नाही. शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आमची बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.”

आझम पानसरे म्हणाले, “आम्ही सर्वजण १९८६ पासून एकत्र होतो. शहराचा विकास करताना कधी पक्षभेद केला नाही. शहर विकासात खीळ बसता कामा नये, ही माझी भूमिका आहे. शहरात अजूनही चांगली विकासकामे करण्याचा विश्वास भाजपने दिला आहे. त्यामुळे पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये आपली राजकीय कारकिर्दी नव्याने सुरू करणार आहे. मी यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काम केले आहे. सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मला वेगळे वाटत नाही. एकत्र कुटूंब म्हणून शहराच्या विकासासाठी काम करू. तसा विश्वास वाटल्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी मुस्लिम समाज भाजप म्हटले की नको म्हणायचे. परंतु, आता तशी परिस्थिती राहिली नाही. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक मुस्लिम नेत्यांनी त्याचे स्वागत केल्याचे त्यांनी सांगितले.”

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin