Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


“स्मार्ट सिटी”साठी एसपीव्ही कंपनी स्थापन्याचे पिंपरी महापालिकेला आदेश


Main News

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात “स्मार्ट सिटी” प्रकल्प राबविण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत. कंपनी अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आलेली एसपीव्ही ही शासकीय कंपनी असणार आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर हे या कंपनीचे अध्यक्ष असतील. तसेच महापालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता यांच्यासह सत्ताधारी वगळून इतर दोन राजकीय पक्षांचे प्रत्येकी एक नगरसेवक या कंपनीचे संचालक असणार आहेत.

बऱ्याच काळापासून मोठा गवगवा झालेल्या केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी एसपीव्ही प्राधिकरण महत्त्वाचे आहे. त्याशिवाय, स्मार्ट सिटीत सहभाग अशक्य आहे. केंद्र व राज्य शासनाची भागीदारी असलेले विशेष उद्देश वाहन अर्थातच एसपीव्ही ही शासकीय कंपनी असणार आहे. कंपनीचे भाग भांडवल पाच लाख रुपये राहणार असून, महापालिकेकडून महापौर, आयुक्त, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता शासनाचे प्रतिनिधी म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पीएमपीचे अध्यक्ष हे कंपनीचे संचालक असतील. 

याशिवाय सत्ताधारी पक्षाचे वगळून इतर दोन राजकीय पक्षांचे प्रत्येकी एक नगरसेवक, केंद्र शासनाचा एक प्रतिनिधी, केंद्रीय कंपनी व्यवहाराचे दोन स्वतंत्र संचालक असतील. या कंपनीचे अध्यक्ष नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर असतील. असे एकूण १५ संचालकांचा समावेश असलेली एसपीव्ही कंपनी स्थापन करण्याचे आदेश सरकारने महापालिकेला दिले आहेत. या कंपनीचे नाव ठरविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच कंपनीचे मुख्यालय पिंपरी-चिंचवड महापालिकेतच असणार आहे.

या कंपनीला विविध प्रकल्पांसाठी महापालिकेच्या मान्यतेने कर्ज उभा करण्याची मुभा असेल. कर्जाची संपूर्ण जबाबदारी कंपनीची आणि महापालिकेची असेल. या कर्जाची सरकार कोणतीही हमी घेणार नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या ५० कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या प्रकल्पांना शासनाच्या उच्चाधिकार समितीची पूर्व मान्यता घ्यावी लागणार आहे. एसपीव्ही कंपनीला मुख्य कार्यकारी अधिकारी नेमावा लागणार असून, अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील असणार आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin