Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


राष्ट्रवादीच्या आंदोलनात ‘अब की बार मोदी सरकार’ अशी घोषणाबाजी!


Main News

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) - मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवार) मावळ येथे केलेल्या आंदोलनात उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा देण्याऐवजी मोदी सरकारच्या कौतुकाच्याच घोषणा दिल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी गोची झाल्याचे दिसून आले. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क ‘अब की बार मोदी सरकार’ अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या उत्साही घोषणांबाजीमुळे नेत्यांचे चेहरे ओशाळले होते. या आंदोलनात घोषणाबाजी करताना कार्यकर्त्यांकडून गल्लत झाल्याचे सोशल मीडियातून व्हायरल झाले. 

मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस झाले आहेत. त्यानंतरही परिस्थितीत काहीच बदल  झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने राज्यभरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. मुंबई-पुणे महामार्गावर सकाळी १२.३० ते १ च्या दरम्यान हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी चित्रा वाघ यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यांच्या मागोमाग कार्यकर्त्यांनीही घोषणा देण्यास सुरूवात केली. वाघ यांनी ‘अब की बार’ म्हणताच कार्यकर्ते मोदी सरकार म्हणू लागल्याने एकच खळबळ उडाली. वास्तविक अब की बार फेकू सरकार अशी घोषणा द्यायची होती. परंतु उत्साही कार्यकर्त्यांनी मात्र अब की बार मोदी सरकार अशी घोषणा दिली. या प्रकारानंतर चित्रा वाघ यांनी लगेच परिस्थिती सावरत अब की बार फेकू सरकार अशी घोषणाबाजी देण्यास सुरूवात केली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin