Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


होय, भ्रष्टाचाराच्या पुराव्याने राष्ट्रवादीचा तोल सुटला; “पीसीबी”च्या ६५ टक्के वाचकांचे मत


Main News

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या अनेक महिन्यांपासून गाजत आहेत. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीची जनमानसांत प्रतिमा मलीन झाली आहे. ही प्रतिमा सुधारण्याऐवजी पुन्हा पुन्हा त्याच चुका राष्ट्रवादीकडून होत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधकांना आयतीच संधी प्राप्त होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षावर होणाऱ्या आरोपांना पुराव्यासह उत्तर देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आणि नगरसेवकांचा तोल जात असल्याचे चित्र आहे. “पीसीबी”च्या ६५ टक्के वाचकांनीही महापालिकेतील भ्रष्टाचाराचे विविध पुरावे समोर आल्यामुळे राष्ट्रवादीचा तोल सुटला असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

महापालिकेत गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे हेच नगरसेवक व नेते काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे महापालिकेच्या स्थापनेपासून हेच सत्ताधीश आहेत. या सत्तेचा वापर शंभर टक्के शहर विकासासाठी करण्याऐवजी विकासाच्या नावाखाली स्वविकासाचाच अजेंडा राबविण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांकडे आपल्या सात पिढ्या बसून खातील, एवढी संपती जमा केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. हे सर्व करदात्यांच्या पैशातून शक्य झाले आहे. इतके खाऊन सुद्धा या नेत्यांचे अजून पोट भरलेलेच नाही, अशी परिस्थिती आहे.

महापालिकेतील पाशवी बहुमताच्या जोरावर वाटेल तसे निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादीचा नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे व भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी बुरखा फाडला आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षांत महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्याचे पुरावेही त्यांनी दिले आहेत. मात्र केंद्र व राज्यातील सत्तेचा दुरूपयोग करून दोषींवर कारवाई करण्याऐवजी भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबून ठेवण्याचेच काम राष्ट्रवादीने केले. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाई होऊ लागल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे. 

गेल्या काही महिन्यांत विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, गॅस शवदाहिनीसह अनेक साहित्यांच्या खरेदीतील भ्रष्टाचार समोर आला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे पक्षाला परवडणारे नसल्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या कारभारात सुधारणा करणे गरजेचे होते. परंतु, तसे न होता निर्ढावलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमचे कोण काय वाकडे करणार अशा भ्रमात राहून पहिले पाढे पंचावन्न असाच कारभार सुरू ठेवला. मात्र नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे व सारंग कामतेकर यांनी भ्रष्टाचाराची प्रत्येक प्रकरणे चव्हाट्यावर आणल्यामुळे राष्ट्रवादीची शहरभर बदनामी झाली. अशातच निगडी सेक्टर क्रमांक २२ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील खऱ्या लाभार्थ्यांना हुसकावून लावून बोगस लाभार्थींना घरे देण्याचा राष्ट्रवादीचा प्रताप समोर आला. 

या मुद्द्यावरून स्वतः महापालिकेनेच पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मात्र हे प्रकरण नगरसेविका सीमा सावळे यांनी उघडकीस आणल्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी खाडे यांनी महासभेत सावळे यांना पाहून दंड थोपटले. धक्कादायक बाब म्हणजे महिला असूनही राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम यांनी चिथावणी दिल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. एवढ्यावरच न थांबता सीमा सावळे यांच्याच विरोधात मोर्चे, मुख्यमंत्र्यांना पत्र असे नाटकही राष्ट्रवादीने केले. त्यामुळे भ्रष्टाचाराचे पुरावे सादर झाल्याने राष्ट्रवादीचा तोल सुटला आहे का?, असा प्रश्न पीसीबीच्या वाचकांना विचारण्यात आला होता. तब्बल ६५ टक्के वाचकांनी होय, राष्ट्रवादीचा तोल सुटला असल्याचे मत नोंदविले आहे. २८ टक्के वाचकांनी नाही, तर ६ टक्के वाचकांनी माहिती नाही, असे म्हटले आहे. केवळ एक टक्का वाचक तटस्थ राहिले आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin