Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


दोन महिन्यांनंतर बँकांकडून पैशांचे वितरण सुरळित; बँका व एटीएमसमोरील गर्दी झाली कमी


Main News

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला रविवारी (दि. ८) दोन महिने पूर्ण झाले. पहिले पन्नास दिवस शहरातील बँकांत भेडसावणारी चलन टंचाई आता दूर झाली आहे. त्यामुळे सर्वच खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये २४ हजार रुपयांचे वितरण केले जात आहे. एटीएमवरही साडेचार हजार रुपये सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बँका आणि एटीएम या दोन्हीवरची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे.

नोटाबंदीच्या पन्नास दिवसांनंतर जानेवारी महिन्यातील पगारही सुरळीत पार पडले. यापूर्वी डिसेंबरमध्ये पगारासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र जानेवारीत बँकांना पगार करण्यात कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. रिझर्व्ह बँकेकडून यापूर्वीच बँकांना अपेक्षित रक्कम प्राप्त झाली आहे. शहरात रकमेचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. यापूर्वीच्या चलन तुटवड्याचे चित्र आता बदलले आहे. आरबीआयकडून पतपुरवठा करण्यात आल्यामुळे वितरणात कोणतीही अडचण नसल्याचे एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

बँकांमधील गर्दी आता कमी झाली आहे. २४ हजारांचे वितरणही सुरळीत सुरू आहे. त्यामुळे एटीएम आणि बँका दोन्ही ठिकाणी गर्दी पाहायला मिळत नाही. तसेच बँकांमध्ये डिपॉझिटचे प्रमाणही वाढले असल्याने वितरण सुरळीत करण्यास फायदा होत आहे.  शहरात बँका आणि एटीएम दोन्ही ठिकाणी नोटाबंदीनंतर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र आता बँकेतही गर्दी नाही. तसेच एटीएमवरही पैसे उपलब्ध असल्यामुळे तेथील रांगा कमी झाल्या आहेत. सध्या एटीएममध्ये साडेचार हजार रुपये मिळत असल्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin