Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


आमदार लक्ष्मण जगताप ठरले पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील “किंगमेकर”


Main News

>> बेरजेच्या राजकारणामुळे जगतापांचे भक्कम नेतृत्व तयार

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – बेरजेचे राजकारण करत आझम पानसरे यांना भाजपमध्ये घेऊन राष्ट्रवादीला  मोठे खिंडार पाडणारे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील “किंगमेकर” ठरले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून शहरात प्रथमच कमळ फुलविणारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आता महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. त्यात त्यांना यश मिळेल, अशीच राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर स्थानिक नेतृत्वासाठी पोरके झालेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार जगताप यांच्या रुपाने भक्कम नेतृत्व तयार झाले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आमदार जगताप विरूद्ध बारामतीचे आमदार अजितदादा पवार असा सरळ सामना पहावयास मिळणार आहे. 

आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. “राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्रही नसतो”, या उक्तीप्रमाणे त्यांनी राजकारणातील आपल्या जुन्या सहकाऱ्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय शत्रुत्वाऐवजी सर्वांना सोबत घेतले, तरच पक्षाचा विस्तार आणि शहराचा विकास या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात, याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी त्यादृष्टीने राजकीय जुळवाजुळव केली. पक्षाचे शहराध्यक्षपद मिळाल्यानंतर जुन्या व नव्यांचा मेळ घालत पक्षांतर्गत कुरबुरी संपविल्या. हे करत असताना त्यांचे मुख्य टार्गेट महापालिका निवडणूक होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महापालिका जिंकण्यासाठी आमदार जगताप यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. तसेच ही निवडणूक आमदार जगताप यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. जबाबदारी वाढल्यामुळे आमदार जगताप यांनी राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना भाजपमध्ये घेतले. त्यातील कोणी नाराज होणार नाही, याची पुरेपूर काळजीही त्यांनी घेतली. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद दुपटीने वाढली आणि महापालिका निवडणूक जिंकण्याच्या आमदार जगताप यांच्या इराद्यांना बळ मिळाले. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांचा पक्ष प्रवेश घडवून आणतील, असा राजकीय अंदाज वर्तविली जात होता.  

या अंदाजांना खोटे ठरवत आमदार जगताप यांनी आपले राजकीय वैरी माजी महापौर आझम पानसरे यांचाच पक्षप्रवेश घडवून आणत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. पानसरे हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून राजकीय अडगळीत पडल्यामुळे आणि आमदार अजितदादा पवार हे पानसरेंना राजकारणातूनच संपवतील, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमदार जगताप यांनी आपले राजकीय वैर बाजूला ठेवून पानसरे यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पानसरेंच्या राजकीय पुनर्वसनाचा शब्द घेऊन आमदार जगताप यांनी त्यांचा भाजप प्रवेश घडवून आणला आहे. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी देखील मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे जगताप-लांडगे जोडीने राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. 

जगताप यांच्या या बेरजेच्या राजकारणामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पानसरे यांच्या प्रवेशामुळे जगताप यांची डोकेदुखी वाढणार की त्याचा त्यांना फायदा होणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. परंतु, जगताप यांनी राजकीय वैर विसरून पानसरे यांना सोबत घेतल्यामुळे ते पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील किंगमेकर ठरले आहेत, हे मात्र निश्चित. जगताप यांच्या डावपेचामुळे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर स्थानिक नेतृत्वासाठी पोरके झालेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रुपाने भक्कम नेतृत्व तयार झाले आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीत आमदार जगताप विरूद्ध आमदार अजितदादा पवार असाच सामना रंगणार आहे.   

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin