Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


राष्ट्रवादीला खिंडार; आझम पानसरे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश


Main News

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी (दि. ९) रात्री उशिरा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पानसरे यांचा भाजपमधील प्रवेश म्हणजे पिंपरी-चिंचवडमधील राजकारणाचा हा मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादीची चारही बाजूने घेराबंदी केली असून, आता महापालिकेत राष्ट्रवादीची हॅट्रटिक होणे अवघड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.


भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी आझम पानसरे यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. रविवारी रात्री उशिरा झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. बालेकिल्ल्यातच भाजपने राष्ट्रवादीला नामोहरम केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी महापालिका निवडणुकीची वाट बिकट बनली आहे. 

राष्ट्रवादीत राजकीय अस्तित्वासाठी झगडूनही काहीच हाती न लागल्यामुळे आझम पानसरे गेल्या काही वर्षांपासून नाराज होते. विशेषतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व आमदार अजित पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत ते जाहीरपणे नाराजीही व्यक्त करत होते. मात्र त्यांना राजकीय मार्ग सापडत नसल्यामुळे चाचपडत होते. त्यातून त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन परत राष्ट्रवादीची वाट धरली होती. विधान परिषद निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे ते पक्षाच्या व्यासपीठावरूनही गायब झाले होते. अखेर त्यांनी रविवारी रात्री भाजपची वाट धरली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे या दोघांनीही प्रयत्न केले.  


">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin