Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


आज मध्यरात्रीपासून पेट्रोलपंपावर क्रेडिट, डेबिट कार्ड स्वीकारणे बंद


Main News

नवी दिल्ली, दि.८ (पीसीबी) बँकांनी पेट्रोल पंपांना कार्ड पेमेंटवर १ टक्का अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पेट्रोल पंप चालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाविरोधात ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे व्यवहार केले जाणार नाही, असे जाहीर केले आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिझेल पंप डीलर्सचे असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

या निर्णयाबाबत पेट्रोलियम मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. बँकांनी अशा प्रकारचा काही निर्णय घेतला असल्याचे आम्हाला माहीत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. व्यवहारावर १ टक्का अतिरिक्त शुल्क लावण्यात येणार असल्याचे समजताच पेट्रोल पंप चालक असोसिएशनने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्राहकांना कार्डने व्यवहार केल्यास पेट्रोल-डिझेलवर ०.७५ टक्क्यांची सूट देण्याचे ठरवले आहे तर बँकांनी हा भार पेट्रोल पंप चालकांवर टाकण्याचे ठरवले आहे. याबाबत आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकांनी शनिवारी रात्री सर्व पेट्रोल पंपांना सूचना पाठवली. यात त्यांनी १ टक्का अतिरिक्त शुल्क लावले जाईल असे नमूद केले आहे. या तीन बँकांनी भारतातील जवळपास ६० टक्के पेट्रोल पंपांना पॉइंट ऑफ सेल मशीन दिलेल्या आहेत. 

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचा रिटेलचा दर सरकार ठरवत असल्यामुळे आम्ही ग्राहकांकडून १ टक्के अतिरिक्त शुल्क आकारू शकत नाहीत. हा भुर्दंड आम्हालाच सोसावा लागणार आहे. तेव्हा बँकांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, असे पेट्रोल पंप संघटनेनी म्हटले आहे.
">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin