Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच सादर होणार; राष्ट्रपतींची मंजुरी


Main News

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) - केंद्रीय अर्थसंकल्प यावर्षी एक फेब्रुवारीलाच सादर होणार आहे. पहिल्या दिवशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. ३१ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. रेल्वे बजेट देखील यावर्षीपासून याच अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट असेल. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याच्या केंद्राच्या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. 


अर्थसंकल्पापूर्वी पाच राज्यांच्या निवडणुका असून सरकार अर्थसंकल्पात विविध घोषणा करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता. त्यामुळे निवडणुकीनंतर अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती.

निवडणूक आयोगाने विरोधकांच्या मागणीला उत्तर द्या, अशी सूचना सरकारला केली होती. मात्र आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर १ फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर होईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, सरकारने अर्थसंकल्प आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यास एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात योजना अंमलात आणता येतील, असे सरकारने म्हटले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या काळात होईल. राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित करुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात करतील. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातच अर्थसंकल्प सादर केला जाईल. रेल्वेसंबंधीत तरतुदीही याच अर्थसंकल्पामध्ये असतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या काळात होईल. 

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin