Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


महापालिका निवडणूक सॉफ्टवेअरचा धमाका; प्रभागनिहाय पॅकेज


Main News

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सॉफ्टवेअरचे असंख्य फंडे बाजारात आले असून इच्छुकांच्या गळी ते उतरविण्यासाठी असंख्य ‘कल्पनांचे आविष्कार’विविध कंपन्यांकडून होत आहेत. १५ हजारांपासून ते दीड लाखापर्यंतचे प्रभागनिहाय पॅकेज सध्या पिंपरी-चिंचवडच्या राजकीय बाजारात फिरत आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ३५ ते ४० जण या सॉफ्टवेअर व्यवसायात उतरले आहेत. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही कंपन्यांनी ‘आधी वापरून पहा मग विश्वास ठेवा’, या धर्तीवर फ्री ट्रायल पॅकही देण्यास सुरुवात केली आहे.

निवडणुकीत कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारत घरोघर प्रचार करण्याचा पारंपरिक फंडा नव्या तंत्रज्ञानाच्या प्रवेशामुळे बऱ्याच प्रमाणात हद्दपार झाला आहे. प्रत्येक मतदाराच्या हाती असलेला मोबाइल फोन आणि सोशल मीडिया हा निवडणूक प्रचारासाठी उत्तम माध्यम असल्याची जाणीव झाल्यानंतर अनेक राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी आपला मोर्चा याच माध्यमाकडे वळविला आहे. प्रभागातील मतदार याद्यांनुसार प्रचाराचे पॅकेज तयार केले जात असून त्यात अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. 

एका कंपनीने तर मतदारांचे मोबाइल क्रमांक आणि तो कोणत्या पक्षाचा मतदार आहे, अशी माहितीही आपल्या पॅकेजमध्ये दिली आहे. आपला मतदार असेल तर तो हिरव्या रंगाने आणि नसल्यास लाल रंगाने ती नावे याद्यांमध्ये दर्शविण्यात आली आहेत. मोठमोठ्या राजकीय पंडितांनाही आगामी निवडणुकीत मतदारांच्या कल कुठे असेल, हे सांगता येत नसताना या कंपनीने बेधडक तसे गणित मांडणारे पॅकेज तयार केले आहे. एका कंपनीने मतदानाच्या दिवशी ठराविक मतदाराने मतदान केले की नाही हे प्रत्येक कार्यकर्त्याला समजेल अशी रचना सॉफ्टवेअरमध्ये असल्याचे सांगत ते पॅकेज इच्छुकांच्या गळी उतरविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.  

एका कंपनीने चक्क मतदारांची शैक्षणिक आर्हता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये देत त्याचा कल कुठे असेल, याचे आडाखे बांधण्याचा प्रयत्न केला आहे. काही कंपन्यांनी प्रत्येक प्रभागात इच्छुकांचा नावाचा पोलही घेतला आहे. मतदार याद्या मिळवायच्या आणि सॉफ्टवेअर डेव्हलप करून त्यात वेगवेगळ्या ऑफर्स द्यायचा सपाटा या कंपन्यांनी सध्या लावलेला आहे. पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या कंपन्या संपर्क साधत असून नक्की कुणाचे पॅकेज घ्यायचे, यावरून नेतेही गोंधळल्याचे चित्र आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin