Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


पिंपरी महापालिका निवडणुकीत उमेदवारीत घराणेशाहीच; सच्च्या कार्यकर्त्याचे मरण


Main News

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी जोरदार फील्डिंग लावली आहे. आरक्षणात पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश नगरसेवकांना फटका बसलेला नसला तरी प्रत्येक पक्षातील इच्छुकांची संख्या पाहता महिलांसाठी राखीव जागेवर आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक सर्वपक्षीय नगरसेवक व इच्छुक सज्ज झाले आहेत. नगरसेवकांच्या या घराणेशाहीमुळे सच्चा कार्यकर्ता डावलला जाण्याची चिन्हे आहेत.


पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना झाली. त्यामुळे ६० टक्के विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग महिला व ओबीसी व अनुसूचित जाती या आरक्षणांसाठी गेले आहेत. मात्र या आरक्षणामुळे नगरसेवकांना फार मोठा फटका बसलेला नाही. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रत्येक प्रभागात खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा राखीव आहेत. मात्र इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे विद्यमान नगरसेवकांची आणि काही दिग्गज इच्छुकांची राजकीय गोची झाली आहे. 

ऐनवेळी उमेदवारी कापली गेल्यास पळापळ नको म्हूण अनेक नगरसेवक व इच्छुक आपली पत्नी, मुलगा, मुलगी व अन्य नातेवाईकांना निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या दहा वर्षात राष्ट्रवादीने अनेक विद्यमान नगरसेवकांची पत्नी, भाऊ, बहीण व अन्य नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचा इतिहास आहे. 

खासदार, माजी आमदार, माजी महापौरपुत्रांचे तिकिटासाठी प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर शिवसेना, भाजपमध्येही आपल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळावी, यासाठी नेते व नगरसेवक प्रयत्नशील आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे हे नेते आपल्या मुलांसाठी प्रयत्नशील आहेत. या घराणेशाहीमुळे सर्वच पक्षातील सच्चा कार्यकर्ता डावलला जाण्याची चिन्हे आहेत. 

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin