Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


भाजप-विश्वास, राष्ट्रवादी अतिआत्मविश्वास, तर काँग्रेस व शिवसेना सावध!


Main News

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हा लागायची तेव्हा लागो, शहरात सर्वच राजकीय पक्षांनी रान जोरात तापवायला सुरू केले आहे. विकासकामांच्या उद्घाटनाच्या माध्यमातून दिवसाला नारळ किती फुटतात त्याचा हिशेबही लागत नाही. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत ताकदीचा अंदाज आल्याने भाजपही सत्तास्पर्धेत उतरला असल्याची स्थिती आहे. शिवसेनेनेही डरकाळी फोडली आहे. काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. रिपब्लिकन पक्षाची (आठवले गट) भाजप काय देणार याकडे लक्ष आहे.  

सर्वच पक्षांना स्वबळाची खुमखुमी आली आहे. आतून युती आणि आघाडीची चर्चा असली, तरी वरून मात्र सर्वच पक्षांच्या मनात वेगळेच आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत बहुरंगी लढतींची शक्यता आहे. शहरात भाजपची प्रचंड ताकद वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होणार का हे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही पक्षांची आघाडी झाली तरीही भाजप जोरदार मुसंडी मारणार हे नक्की. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते-कार्यकर्ते सध्या सुसाट आहेत. सलग दहा वर्षे सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्त्यांना महापालिकेवर आपलाच झेंडा फडकल्याचे स्वप्न पडून लागले आहे. हा अतिआत्मविश्वास तर ठरणार नाही ना असेच सध्याचे राजकीय चित्र आहे. 

महापालिकेत दहा वर्षे राष्ट्रवादीच्या जिवावर एकप्रकारे सत्तेत राहूनही काँग्रेसची भूमिका अजून सावध आहे. शहरातील तिनही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल. काँग्रेस संपवायला निघालेले अजित पवार यांच्यासोबत हा पक्ष जाणार का हा खरा प्रश्न आहे. अजित पवार काँग्रेसला जवळ करणार की स्वतंत्र लढणार यावर पुढची गणिते अवलंबून राहणार आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ही ओळख या निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी अजित पवारांना काँग्रेसचे पाय धरण्याशिवाय पर्याय नाही. 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या रुपाने शहरात कमळ फुलले. त्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे आउटसोर्सिंग सुरूच आहे. त्याचा फटका महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. भाजपने राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी टक्कर देण्याची जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यात विकासकामांची उद्घाटने सुरू आहेत. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. या सर्व वातावरणाचा राजकीय इफेक्ट पिंपरी-चिंचवडवरही होत आहे. अजित पवार यांनी तर मागेपुढे न पाहता योग्य की अयोग्य हे न तपासता शहरात विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटनांचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमुळे शहरातील राजकीय रान जोरदार तापलेले आहे.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin