Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे खास अॅप; True Voter


Main News

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – निवडणूक आयोगाने मतदारांना सर्व माहिती एका क्लिकवर देण्यासाठी True Voter हे अॅप लाँच केले आहे. नगरपालिका निवडणुकीदरम्यानही या अॅपचा वापर करण्यात आला असून निवडणूक आयोगाला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. True Voter अॅप नागरीक, मतदार, निवडणुकीशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, राजकीय विश्लेषक यांना उपयोगी ठरणार आहे. या अॅपचे मुख्य कार्य मतदारांना यादीतील नावाचा शोध उपलब्ध करून देणे आहे.

गुगल प्ले स्टोअरवरुन स्मार्टफोन युझर्स हे अॅप डाऊनलोड करु शकतात. या अॅपमुळे मतदार, उमेदवार आणि अधिकारी या सर्वांनाच मोठा फायदा होणार आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये या अॅपचा फायदा होणार आहे.

मतदारांसाठी सुविधा 
मतदारांना आपले मतदान कार्ड, मतदार संघ यांविषयी संपूर्ण माहिती मिळेल. गुगल मॅपच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत जाता येईल. प्रभागात निवडणुका लढविणाऱ्या उमेदारांचा संपूर्ण तपशील माहिती करुन घेता येईल. मतदारांच्या अपेक्षा आणि प्रभागातील अडचणी उमेदवारांपर्यंत पोहोचविता येईल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी व मतदानाबाबतची माहिती मिळवता येईल. निवडणुकीचा निकाल पाहता येईल. स्वत:ची माहिती फोटोसहित अद्ययावत करता येईल. आधार, मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी अद्ययावत करता येईल. गैरहजर, स्थलांतरित, मयत आणि बोगस मतदारांना चिन्हांकित करून कळवता येईल. स्वत:चे मत सिक्युरिटी प्रश्नाव्दारे सुरक्षित करता येईल. आपत्कालिन परिस्थितीत तातडीचे संपर्क जतन करता येतील. एकाच मोबाईलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणे शक्य होणार आहे

अधिकाऱ्यांसाठी सुविधा
अधिकाऱ्यांच्या नोंदणीमध्ये अधिकारी/कर्मचारी यांचे Hierarchical Structure तयार करणे, सोप्या आणि अचूक पध्दतीने मतदार यादी तयार कण्याकरिता कंट्रोल चार्ट तयार करणे, मतदान केंद्राचे ठिकाण गुगलवर चिन्हांकित करणे, आयोग, आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचे संदेश थेट नोंदणी झालेल्या मतदारांना पाठविणे, मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान केंद्राचा दोन तासांचा अहवाल पाठविणे, राज्य निवडणूक आयोग ते मतदान केंद्राध्यक्ष या निवडणूक यंत्रणेमध्ये सोप्या संभाषणाचे माध्यम देणे, मतमोजणी आणि निकालाची माहिती मतदारांसाठी टाकणे, 

उमेदवारांसाठी सुविधा 
निवडणुकीचा खर्च ऑनलाईन देणे, दैनंदिन खर्चाचा आणि एकूण खर्चाचा अहवाल आणि प्रतिज्ञापत्र मिळविणे, स्वत:चा वैयक्तिक तपशील आणि केलेल्या कामगिरीची माहिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी असलेले स्वप्न मतदारांपर्यंत पोहोचविणे, मतदान केंद्रनिहाय यादी मिळविणे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin