Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


वाहतूक पोलिसांच्या हप्त्याचे दरपत्रक उच्च न्यायालयात सादर


Main News

मुंबई, दि. ६ (पीसीबी) - मुंबईतील वाहतूक पोलीस विभाग भ्रष्टाचाराने बरबटलेला असून प्रत्येक गुन्ह्यासाठी वाहतूक पोलिसांचे दरपत्रक ठरलेले आहे. तसेच भ्रष्टाचार करण्यास नकार दिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ केला जात आहे, असा  सनसनाटी गौप्यस्फोट पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी केला आहे. याबाबत टोके यांनी व्हिडीओ पुराव्यांसह जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 


पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी अॅड. दत्ता माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत टोके यांनी वाहतूक विभागात सध्या सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात दाद मागितली आहे. यासंदर्भात वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करुनही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे अखेरीस टोके यांनी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.  टोके यांनी उच्च न्यायालयात सादर केलेली माहिती आणि आरोप हे फार गंभीर आहेत. या याचिकेवरील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, प्रत्येक वाहतूक विभागात दोन हवालदारांची हफ्ता वसुलीसाठी नियुक्ती केली आहे. बड्या हॉटेल्सकडून, कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगसाठी दरमहा ४० ते ५० हजार रुपयांचा हफ्ता घेतला जाते. कॉर्पोरेट कंपन्यांकडून रस्ते खोदकामाच्या कामासाठी ५० हजार ते १ लाख रुपये महिन्याला हफ्ता ठरलेला आहे. टीव्ही सीरियल, सिनेमा शूटिंग आणि मोठ्या जाहिरातींचे शूटिंग करणाऱ्यांकडून ५० हजार ते १ लाख रुपयांचा हफ्ता वसूल केला जातो. एक्झिबिशन सेंटर, नेस्को, बीकेसी येथील मोठ्या आयोजनादरम्यान एका कार्यक्रमाला १ लाख रुपयांचा दर निश्चित केला आहे. 

ड्रिंक अँड ड्राइव प्रकरणात ५ ते १० केसेसचे टार्गेट असतानाही ४० ते ५० केसेस घेतल्या जातात. मात्र कागदोपत्री केवळ ५ ते १० केसेस दाखवल्या जातात. पकडलेल्यांची आर्थिक क्षमता ओळखून त्यांच्याकडून प्रत्येकी १० ते ५० हजार रुपये घेतले जातात. मुंबईत बेकायदेशीररित्या धंदा करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून दरमहा १ ते २ हजार रुपयांचा हफ्ता घेतला जातो. प्रत्येक डॉमिनोज, मॅकडोनल्ड, पिझ्झा हटची डिलीवरी करणाऱ्या विक्रोत्यांकडून दरमहा २० ते २५ हजार रुपयांचा हफ्ता घेतला जातो.

 प्रत्येक टू-व्हिलर शोरुम कडून ५ हजार तर फोर-व्हिलर शोरुम कडून १० हजारांचा हफ्ता घेतला जातो. प्रत्येक टँकरकडून दिवसाला १०० ते २०० रुपये उकळले जातात. सिमेंट मिक्सर, रेती, विटांचा वापर करणाऱ्या बांधाकाम साईट्सवरुन २५ ते ३० हजार रुपये महिना हफ्ता आकारला जातो. बेकायदेशीररित्या ओव्हरलोडिंग करणाऱ्या प्रत्येक ट्रककडून दिवसाला ३ ते ४ हजार रुपये घेतले जातात. शाळकरी मुलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्हॅन्सकडून दरमहा १ ते २ हजार रुपये हफ्ता वसूल केला जातो. ऑक्ट्राय चुकवून येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून ४ ते ५ हजार रुपये हफ्ता गोळा केला जातो. 
 
बेकायदेशीर पार्किंगमधून वाहन टोईंग करण्याचे कंत्राट हे खाजगी कंपन्यांना दिलेले आहे. ताबडतोब गाड्या सोडल्या की त्यांच्याकडून जी रक्कम आकारली जाते, त्यातील २० रुपये त्या गाडीवरील हवालदाराला आणि उर्वरित रक्कम त्या ट्रॅफिक चौकीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला दिली जाते. 

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin