Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


पिंपरी महापालिकेचा कर ऑनलाइन भरल्यास समान्य करात २ टक्के सूट


Main News

>> महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील मतदारांना खुश करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने २०१७-१८ या पुढील आर्थिक वर्षांसाठी मिळकतकरासह अन्य करांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. ६) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत घेतला. त्याचप्रमाणे शहरातील करदात्यांनी कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा यासाठी ऑनलाइन करभरणा केल्यास २०१७-१८ या पुढील आर्थिक वर्षाच्या समान्य करात 2 टक्के सवलत देण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीला मोदी सरकारचा कॅशलेस व्यवहाराचा मुद्दा पटला असल्याचे मानले जात आहे. 

महापौर शकुंतला धराडे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने विशेष महासभा बोलावून पुढील आर्थिक वर्षासाठी कराचे दर निश्चित केले. ही विशेष महासभा गणसंख्येअभावी दोनवेळा तहकूब करण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती. अखेर शुक्रवारी ही सभा पार पडली. या सभेपुढे २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी मिळकतकर आणि इतर करांचे दर चालू आर्थिक वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्याचा प्रस्ताव होता. त्यावर कोणतीही चर्चा झाली. 

नगरसेविका माया बारणे यांनी महापालिकेच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी भूमी व जिंदगी विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी थकीत भाडे वसुलीची मागणी त्यांनी केली. पक्षनेत्या मंगल कदम यांनी आगामी आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ करण्यात येणार नसल्याचे सांगितले. तसेच शहरातील नागरिकांनी कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा यासाठी महापालिकेकडे ऑनलाइन करभरणा करणाऱ्यांना सवलत देण्याची उपसूचना त्यांनी मांडली. त्यानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात ऑनलाइन मिळकतकर भरणाऱ्या करदात्याला मिळकतकरातील सामान्य करात 2 टक्के सवलत दिली जाणार आहे. या उपसूचनेसह पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरासह इतर करामध्ये कोणतीही वाढ न करण्याच्या प्रस्तावाला महापौर धराडे यांनी सभेत मंजुरी दिली. 
">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin