Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


जाता जाताही राष्ट्रवादीत भ्रष्टाचारावरूनच उडाले खटके; धराडे व कदम यांच्यात शाब्दिक चकमक


Main News

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जाता जाता शेवटच्या सर्वसाधारण सभेत देखील भ्रष्टाचारावरूनच खटके उडाले. पीएमपीसाठी ८०० बसेस खरेदीच्या प्रस्तावावरून महापौर शकुंतला धराडे आणि पक्षनेत्या मंगला कदम व योगेश बहल यांच्यात शुक्रवारी (दि. ६) झालेल्या विशेष सभेत शाब्दिक चकमक झाली. बस खरेदीत काळेबेरे असल्याचे सांगत मंगला कदम यांनी स्वपक्षाच्याच भ्रष्टाचारावर बोट ठेवले. महापौर धराडे यांनी यापूर्वीची बस खरेदी जादा दराने करण्यात आल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधताना तेव्हा हा मुद्दा का उपस्थित केला नाही, असा सवाल करत पक्षनेत्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली. तसेच आपलाच पक्ष दुटप्पी भूमिका घेत असल्याचे सांगून महापौर धराडे यांनी मंगला कदम यांना सणसणीत चपराक लगावली.  

महापौर शकुंतला धराडे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पीएमपीसाठी ८०० बसेस खरेदी आणि पुढील आर्थिक वर्षाचे कराचे दर निश्चित करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन दिवसांपूर्वी विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र महापालिकेत तब्बल ९२ नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीवर ही विशेष सभा गणसंख्येअभावी दोन वेळा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली. अखेर ही सभा शुक्रवारी पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच पीएमपीसाठी ८०० बसेस खरेदी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. पीएमपीच्या संचालक मंडळावर सर्वजण राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आहेत. तरीही पक्षनेत्या मंगला कदम यांनी या बस खरेदीत भ्रष्टाचार असल्याचा आरोप करून विरोधकांच्या आरोपांना बळकटी प्राप्त करून दिली.

पीएमपी ८०० बसेस खरेदी करत असल्याने त्याची सविस्तर माहिती देण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. त्यानुसार पीएमपीचे अधिकारी प्रशांत वाघमार यांनी सभागृहात बस खरेदीबाबत माहिती दिली. पीएमपीसाठी ८०० बसेस कर्ज काढून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी ३६० कोटी रुपये खर्च येणार असून, एका बसची किंमत ४५ लाख रुपये असल्याचे ते म्हणाले. एकूण खर्च सात वर्षात फेडायचे असून, ८४ महिने दरमहा सहा कोटी ११ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. त्यातील ४० टक्के हिस्सा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाट्याचा असून, पुणे महापालिका ६० टक्के भार उचलणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेला बस खरेदीपोटी ८४ महिने दरमहा २ कोटी ४४ लाख रुपयांचा हफ्ता द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम यांनी आपण ट्रकचा व्यवसाय केल्याचे उदाहरण देऊन एका बसची किंमत ४५ लाख रुपये असूच शकत नसल्याचे ठामपणे सांगितले. त्यावर प्रशांत वाघमारे यांनी या बसमध्ये कॅमेरे, दोन्ही बाजूला दरवाजे आणि अन्य अत्याधुनिक सुविधा असणार आहेत, असा खुलासा केला. त्यामुळे कदम यांनी यापूर्वी २०१२ मध्ये बस खरेदी झाली त्यावेळी एका बसची किती किंमत होती, असा प्रश्न त्यांना केला. वाघमारे यांनी त्यावेळी जेएनएनयुआरएम अंतर्गत एक बस ५५ लाखाला खरेदी केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मंगला कदम यांनी पीएमपीच्या बस खरेदीत भ्रष्टाचारच असल्याचा आरोप केला. पाच वर्षापूर्वी सुमारे ५० लाखाला एक बस खरेदी केलेली असताना आता त्याची किंमत कमी कशी काय झाली?, असा सवाल उपस्थित करून त्यांनी स्वपक्षाचाच भ्रष्टाचार सभागृहात उघड केला. 

त्यावेळी महापौर धराडे यांनी २०१२ मध्ये बस खरेदी होताना त्यावर चर्चा का झाला नाही?, असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी मंगल कदम यांनी “तुम्हाला राग येण्याचे कारण नाही. तुम्ही बस खरेदी करत नाही.”, अशा शब्दांत महापौरांना सुनावले. महापौरांनीही  आता यावर चर्चा करणे म्हणजे आपलाच दुटप्पीपणा असल्याचे सांगत मंगला कदम यांना घरचा आहेर दिला. मंगला कदम यांनी खरेदीतून पक्षाची बदनामी होते. मागे कशी खरेदी झाली, त्याच्याशी काही देणे-घेणे नसल्याचे सांगत बस खरेदीतील भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. योगेश बहल यांनी मंगला कदम यांची बाजू घेत बस खरेदीत भ्रष्टाचार होऊ नये, असे सांगितले. स्वच्छ कारभार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पीएमपीच्या कारभारावर टिका करून पिंपरी-चिंचवडला देण्यात येणारी सापत्नवादाची वागणूक बंद करण्याची मागणी केली. अखेर राष्ट्रवादीतीलच वादावादीच्या चर्चेनंतर ८०० बस खरेदीच्या प्रस्तावाला सभेत मंजुरी देण्यात आली. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin