Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उघडेनागडे झालेल्या राष्ट्रवादीची सीमा सावळेंच्या विरोधात मोहीम


Main News

>> न्यायालयीन निकालाचा मनासारखा अर्थ लावून सावळेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – निगडी, सेक्टर क्रमांक २२ येथे रेडझोनमध्ये सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत न्यायालयात झालेल्या सुनावणीचा मनासारखा अर्थ लावून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ता जाण्याच्या भितीने ग्रासलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षातील अस्वस्थता गुरूवारी (दि. ५) प्रकट केली. यासंदर्भात नगरसेविका सीमा सावळे यांनी दाखल केलेल्या वैयक्तिक याचिकेचे जनहित याचिकेत (पीआयएल) रुपांतर करण्यास सांगितले आहे. परंतु, राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम, योगेश बहल, प्रशांत शितोळे, तानाजी खाडे यांनी पत्रकार परिषद बोलावून सावळे यांनी आधीच जनहित याचिका का दाखल केली नाही? असा प्रश्न उपस्थित करून स्वतःच्या अकलेचे तारे तोडले. नगरसेविका सावळे यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीला उघडेनागडे केल्यामुळे कदम, बहल, शितोळे, खाडे हे सर्वजण कोणत्याही थराला जातील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

महापालिका निगडी, सेक्टर क्रमांक २२ येथे रेडझोनमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवित आहे. गोरगरीबांच्या जिवाला धोका निर्माण करून हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पापासून देहूरोड दारूगोळा डेपो आहे. या डेपोमध्ये लष्करासाठी अंत्यंत घातक दारुगोळा व शस्त्रास्त्रे निर्माण केली जातात. त्यामुळे याठिकाणी एखादी अनुचित घटना घडल्यास त्याचे परिणाम सेक्टर २२ पर्यंत जाणवणार आहेत. तसेच दारुगोळा डेपोपासून अगदी काही अंतरावरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात एखाद्या अतिरेक्याने घुसखोरी करून काही विघातक कृत्य केल्यास त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार न करता केवळ टक्केवारीसाठी राष्ट्रवादीने सेक्टर क्रमांक २२ येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हाती घेतला. 

प्रकल्पासाठी महापालिकेने लष्कराकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. नगरसेविका सीमा सावळे यांनी ही बाब सत्ताधारी राष्ट्रवादीच्या निदर्शनास आणून दिली. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे त्याबाबत लेखी तक्रार केली. प्राधिकरणाने या प्रकल्पाला आक्षेप घेतल्यानंतर देखील राष्ट्रवादीने राज्यातील आणि महापालिकेतील सत्तेच्या जोरावर आमचे कोण काय वाकडे करणार या आविर्भावात गोरगरीब झोपडीधारकांसाठी तोफेच्या तोंडावर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रेटून नेला. या प्रकल्पासाठी ठेकेदारांना जादा दराने काम आणि कोट्यवधींचा वाढीव खर्च दिला. त्यातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांच्या सात पिढ्या बसून खातील, एवढे पैसे कमाविले.  

हा प्रकल्प चुकीच्या ठिकाणी राबवित असल्याचे निदर्शनास आणून देऊनही राष्ट्रवादीने दखल न घेतल्यामुळे नगरसेविका सीमा सावळे यांनी रेडझोनमधील या प्रकल्पावरून देशाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी (दि. ४) न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सावळे यांनी वैयक्तिक दाखल केलेल्या या याचिकेचे जनहित याचिकेत रुपांतर करण्यास सांगितले आहे. तसेच त्यासाठी अनामत रक्कम म्हणून दहा लाख रुपये जमा करण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे. ही रक्कम जमा करता येत नसेल, तर याचिका मागे घेण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे नगरसेविका सावळे यांनी या याचिकेचे जनहित याचिकेत रुपांतर करण्यास मान्यता दिली आणि दहा लाख रुपये भरण्याची तयारीही दाखविली आहे.  

असे असताना या सुनावणीवरून राष्ट्रवादीच्या पक्षनेत्या मंगला कदम, योगेश बहल, तानाजी खाडे, प्रशांत शितोळे यांनी गुरूवारी महापालिकेत पत्रकार परिषद बोलावून स्वतःच्या अकलेचे तारे तोडले. नगरसेविका सावळे यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादीला उघडेनागडे केले आहे. राष्ट्रवादीने कितीही कपडे घेऊन स्वतःचे अंग झाकण्याचा प्रयत्न केला तरी या पक्षाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे मंगला कदम, योगेश बहल, तानाजी खाडे, प्रशांत शितोळे यांनी सावळे यांच्या विरोधात मोहिमच उघडली आहे. या सर्वांनी न्यायालयाच्या सुनावणीचा संदर्भ देऊन सावळे यांनी याआधीच जनहित याचिका का दाखल केली नाही?, असा सवाल उपस्थित करून न्यायालयीन निकालाचा मनासारखा अर्थ लावून अक्कल पाजळवण्याचा प्रयत्न केला. मुळात राष्ट्रवादीने हा प्रकल्प चुकीचा का राबविला आणि एवढा पैसा खर्च करूनही तो गेला कोठे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. महापालिका निवडणुकीत या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागू नयेत म्हणून राष्ट्रवादी आता वेगवेगळ्या माध्यमातून पळवाटा शोधत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin