Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती भारतींचा राजीनामा; भाजपच्या वाटेवर


Main News

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती भारती यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. त्या भाजपच्या वाटेवर असून, काळेवाडी-विजयनगर प्रभागातील सक्षम महिला उमेदवार आहेत. त्यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. यापूर्वी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी अजितदादांचे घड्याळ हातात घातले आहे. 

एकेकाळी शहरात काँग्रेस सर्वात मोठा राजकीय पक्ष होता. निवडणुकीत काँग्रेसने साधा कार्यकर्ता जरी उभा केला तरी तो हमखास निवडून येणार याची खात्री असायची. मात्र प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर शहरात काँग्रेसचे बुरे दिन सुरू झाले. आमदार अजित पवार यांनी काँग्रेसला संपविले आणि जी काँग्रेस उरली तिला एखादे पद द्यायचे आणि आपण सांगेल तसेच करायला लावण्यास त्यांनी भाग पाडले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिवावर जगणारी काँग्रेस, अशी पक्षाची शहरात स्थिती झाली. 

आता तर राष्ट्रवादीने काँग्रेसला संपविण्याचाच विडा उचलला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने काँग्रेसचे सात नगरसेवक फोडले. या सात नगरसेवकांना राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द दिल्याचे बोलले जाते. सात नगरसेवकांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला खिंडार पडले. आता काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती भारती यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे काँग्रेसला हा दुसरा राजकीय धक्का बसला आहे. ज्योती भारती या काळेवाडी-विजयनगर प्रभागातील सक्षम महिला उमेदवार आहेत. त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin