Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांना महापुरूषांचा कळवळा; जयंती-पुण्यतिथीनिमित्त होर्डिंगबाजी


Main News

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारसरणीचे महाराष्ट्र राज्य देशातील इतर राज्यांपुढे एक आदर्श राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु, खुद्द महाराष्ट्रात मात्र या थोर महापुरुषांची आठवण केवळ त्यांच्या जयंती-पुण्यतिथीपुरतीच उरल्याचे चित्र सध्या दिसून येते. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने विविध समाजांतील अशा थोर महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथींच्या कार्यक्रमांना हजेरी लावून त्यांच्याप्रति विविध राजकीय पक्षांचे नेते अन् इच्छुक उमेदवारांना अवेळी कळवळा आल्याचे दिसून येत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते मिळेल ती संधी कॅश करण्यासाठी अक्षरशः उतावीळ झाले आहेत. लग्न समारंभ, वास्तुशांती, वाढदिवस असे आनंदाचे प्रसंग असोत किंवा अंत्यविधी, दशक्रिया अशी दुःखद घटना असो, एरवी अशा प्रसंगांकडे पाठ फिरविणारे नेते व कार्यकर्ते गेल्या एक-दोन महिन्यांपासून मात्र अशा प्रसंगी उपस्थित राहून तासन् तास वेळ देऊ लागले आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विविध समाजांतील थोर महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी करण्याचाही मोठा कळवळा या नेतेमंडळींना व इच्छुक उमेदवारांना आल्याचे चित्र शहरातील होर्डिंगबाजी बघून येत आहे.

होर्डिंगबाजीचा पुळका

गेल्या एक-दोन महिन्यांत झालेल्या गुरू नानक जयंती, महात्मा फुले पुण्यतिथी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी, संत रोहिदास महाराज पुण्यतिथी, संत गाडगेबाबा जयंती, संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी, काशिबा महाराज पुण्यतिथी आणि आता सावित्रीबाई फुले जयंती यानिमित्त या थोरांना अभिवादनाचे होर्डिंग्ज शहराच्या विशिष्ट भागात उभारण्याचा राजकीय नेते अन् इच्छुक उमेदवारांना भलताचा पुळका आल्याचे दिसून येत आहे. या अभिवादनाच्या होर्डिंग्जद्वारे आपली छबी संबंधित समाजातील मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी या राजकीय मंडळींकडून थोरांच्या जयंती-पुण्यतिथींच्या नावाने जोरदार चांगभले सुरू आहे. यातून ईद, दत्त जयंती, कार्तिक पौर्णिमा, नाताळ असे धार्मिक सण-उत्सवही सुटलेले नाहीत.

आता डोक्यावर, नंतर पायदळी!

निवडणुकांचा ज्वर बहरात आला असल्याने विविध समाजांतील थोरांची जयंती-पुण्यतिथी साजरी करण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने या थोर महापुरुषांचे विचार डोक्यावर घेऊन त्या त्या समाज घटकातील मतदारांची निवडणुकीत मते मिळविण्याचा इच्छुकांचा प्रयत्न आहे.  निवडणुकीनंतर मात्र या थोरांचे विचार चक्क पायदळी तुडविताना दिसतात, असा नागरिकांना अनुभव आहेच. या थोर विभूतींच्या आदर्शांशी काडीमोड घेतलेले सध्या मात्र चक्क होर्डिंग्जवर चमकोगिरी करताना दिसून येत आहेत.

खर्चही होतोय ‘आनंदाने’

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी संबंधित समाजातील थोर महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त राजकीय नेतेमंडळी व इच्छुकांकडून मोठा आर्थिक खर्चही केला जात आहे. होर्डिंगबाजीशिवाय या कार्यकार्यक्रमांसाठीची स्टेज व्यवस्था, ध्वनी यंत्रणा, रोषणाई याकामी येणारा खर्चही इच्छुकांकडून ‘आनंदाने’ केला जात आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin