Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


जीवन “कटी पतंग” ठरू नये; महावितरणचे पतंगप्रेमींना सावधगिरीचे आवाहन


Main News

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - अवघ्या आठवडाभरावर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजाविक्रीची दुकाने सर्वत्र थाटलेली दिसत असून, आकाशातही रंगीबेरंगी पतंगींचा मुक्त विहार वाढतो आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता महावितरणने सर्व पतंगप्रेमींना पतंग उडविताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पतंग उडविण्याचा मोह लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो व हा मोह त्यांना टाळता येत नाही. परंतु, शहरी भागात वीज वितरणाच्या लघु आणि उच्चदाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेली पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकते. अशावेळी काहीजण ती अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रसंगी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असते. त्यामुळे अडकलेली पतंग काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न जीवावर बेतू शकतो. यामुळे अशी अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न करणे टाळावे. 

बरेचदा अडकलेल्या पतंगीचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट होण्याची, प्राणांतिक अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडू शकतो. संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून या उत्सवाला गालबोट लागू नये याकरिता पतंग उडविताना पुरेपूर सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हे लक्षात ठेवा
-वीजतारांवार अडकलेली पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
-वीजतारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
-वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.
-तारांत अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin