Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


नगरसेवक टेकवडे खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मित्रावर हल्ला


Main News

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल वहिले याच्या मित्रावर मिरची पूड टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.   ही घटना आज (शनिवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवड येथील टायटन शोरुमजवळ  घडली. मात्र, हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आदित्य प्रभाकर पवार (वय २६, रा. मोहनगर, चिंचवड) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा दिवंगत नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल वहिले याचा मित्र आहे. आदित्यवर याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आदित्य हा चिंचवड येथील टायटन शोरुमसमोरुन जात असताना दोघे त्याला आडवे आले. त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदित्यने प्रसंगावधान दाखवत तेथून पळ काढला

टायटन शोरुमच्या सीसीटीव्हीमध्ये दोघेजण दिसून येत आहेत. घटनास्थळी पोलिसांना मिरचीपूड सापडली आहे. हल्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र प्रेमप्रकरणातून किंवा पूर्ववैमनस्यातून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin