Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


महापालिका हद्दीच्या वादात साचलेला ४ टन कचरा अखेर नागरिकांनी उचलला


Main News

>> 'स्वच्छ भारत' अंतर्गत पर्यावरण संवर्धन समितीचा पुढाकार

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या 'स्वच्छ भारत' संकल्पनेला पाठिंबा म्हणून पर्यावरण संवर्धन समितीने आज (शनिवारी)  औंध पुला जवळील नदीच्या बाजूचा पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या वादात अडकलेला सुमारे ४ टन प्लास्टिक कचरा गोळा करत दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात दिला.

पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची आखणी केली. सैन्य व पोलिस भारती पूर्व प्रशिक्षण केंद्रातील ९७ विद्यार्थ्यांसह विनिता दाते, विश्वास जपे, पुरुषोत्तम पिंपळे, विक्रांत पाटील, शिकंदर घोडके, विजयकुमार साबरे,  मीरा सानप, संतोष सानप, अंजली देशमुख, वैभव घुले यांच्यासह आदींनी कचरा वेचण्यात सहभाग नोंदविला. 

औंध पुला जवळील नदी बाजूचा चार टन तसेच पुणे महापालिका हद्दीतील एक टन कचरा गोळा करुन परिसर लख्ख करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तुळशीराम साबळे व  पिंपरी महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी दत्तात्रय फुंदे यांच्याकडे हा गोळा करण्यात आलेला कचरा सोपविण्यात आला. महापालिकेचे स्वच्छतेच्या जनप्रबोधनासाठी कायमस्वरूपी फलक लावावेत, अशी मागणीही यावेळी पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात आली.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin