Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


इंद्रायणीनगर प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांच्यात विकासकामांवरून श्रेयवाद


Main News

>> चार वर्षात प्रभागामध्ये नगरसेवकांचे ठोस काम नाही
>> झोपडपट्ट्यांच्या विकासाकडे दोन्ही नगरसेवकांचे पूर्ण दुर्लक्ष
 
पिंपरी, दि. २० (पीसीबी) – प्रभाग क्रमांक २९ इंद्रायणीनगरमध्ये गेल्या चार वर्षांत कोणतीही नवीन विकासकामे झालेली नाहीत. चार वर्षांत जुन्याच कामांवर नवीन मुलामा चढविण्याचे काम नगरसेवकांनी केले आहे. प्रभागातील दोन झोपडपट्ट्यांच्या विकासाकडे नगरसेकांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे या झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छतागृह वगळता अन्य कोणताही विकास पोहोचलेलाच नाही. दोन्ही नगरसेवकांमध्ये प्रत्येक कामांवरून राजकारण रंगलेले असते. आमुक काम आमच्या प्रयत्नातून झाले, हे दाखविण्याची नगरसेवकांमध्ये शर्यत सुरू आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी जी विकासकामे झालेलीच नाहीत, ती केल्याच्या दाव्याची केवळ पेपरबाजी करण्यात नगरसेवक दंग आहेत, असा आरोप या प्रभागातील इच्छुकांनी केला.
 
प्रभाग क्रमांक २९, इंद्रायणीनगरमधून तुषार सहाणे, योगेश लोंढे व सूरज लांडगे हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. या प्रभागाचा बहुतांश परिसर प्राधिकरणाच्या हद्दीतील आहे. याशिवाय दोन झोपडपट्ट्या प्रभागात आहेत. प्रभागात चढ-उताराचा परिसर असल्याने पाणीपुरवठ्याला अडथळा निर्माण होतो. परिणामी इंद्रायणीनगर भागातील सोसायट्यांना पाणी मिळत नाही. त्यांना स्वखर्चाने टँकरने पाणी आणावे लागते. त्यावर नागरिकांचा नाहक खर्च होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रभागात नवीन पाईपलाइन टाकण्याबाबत नगरसेवकांकडून प्रयत्न होत नाहीत. इंद्रायणीनगर भागात सांडपाण्याची चांगली व्यवस्था आहे. परंतु, झोपडपट्टीत अजूनही खुली गटारे आहेत. तेथील सांडपाणी व्यवस्था भूमीगत करण्याची गरज असल्याचे इच्छुक म्हणाले.
 
प्रभागातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. आल्या तरी रस्त्यावरून निघून जातात. या भागात मोठ्या सोसायट्या असल्याने आतमध्ये घंटागाडी जाण्याची व्यवस्था केली पाहिजे. घंटागाड्या रस्त्यावरून निघून गेल्यानंतर नागरिक रस्त्यावरच कचरा ठेवतात. दोन-दोन दिवस कचरा रस्त्यावरच पडलेला असतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. झोपडपट्ट्यांमधील कचरा वेळच्या वेळी गोळा केला जात नाही. या झोपडपट्ट्यांकडे दोन्ही नगरसेवकांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. प्रभागात रस्त्यांची चांगली परिस्थिती आहे. परंतु, केवळ निधी खर्च करायचा म्हणून त्याच त्या रस्त्यांवर पुन्हा पुन्हा डांबरीकरण केले जाते. फुटपाथवरील पेव्हिंग ब्लॉक चांगले असताना ते पुन्हा पुन्हा काढून बसविले जातात. करदात्या नागरिकांच्या पैशांची अशा कामांवर नाहक उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप इच्छुकांनी केला.
 
प्रभागात पाच उद्याने आणि एक स्टेडियम उभारण्यात आले आहे. उद्यानांची चांगली परिस्थिती आहे. परंतु, स्टेडियमचा वापर प्रभागातील नागरिकांना करता येत नाही. प्रभागात भाजी मंडई आणि एक मैदान होण्याची नितांत आवश्यकता आहे. भाजी मंडई उभारण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही नगरसेवक प्रभागातील नागरिकांची वारंवार फसवणूक करत आहेत. भाजी मंडई उभारण्यासाठी भूमीपूजन कार्यक्रमही पार पडला आहे. परंतु, त्याची एकही विट अद्याप रचली गेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे गाळे उभारण्यापूर्वीच त्याच्या वाटपासाठी व्यावसायिकांची नोंदणीही करण्यात आली आहे. भाजी मंडई नसल्याने प्रभागातील रस्त्यांवर अतिक्रमणे करून व्यवसाय केला जातो. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. प्रभागातील रस्ते प्रशस्त असल्याने भरधाव वेगाने वाहने जातात. त्यामुळे ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर उभारण्याचे कामही नगरसेवकांनी केले नसल्याचे इच्छुकांनी सांगितले.
 
चार वर्षांत प्रभागात कोणतेही ठोस काम नगरसेवकांनी केलेले नाही. आजपर्यंत केवळ श्रेयवाद रंगला होता. विकसकामे करताना एकमेकांना खो देण्याचे काम सुरू होते. आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही कामांना सुरूवात करण्यात आली आहे. दोन्ही झोपडपट्ट्यांकडे चार वर्षात कोणतेच लक्ष दिलेले नाही. नगरसेवकांकडून नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही. नगरसेविका नागरिकांशी उद्धटपणे वागतात. प्रभागात त्यांनी कधी तोंडही उघडलेले नाही. अनेक नागरिकांना आपल्या प्रभागाच्या नगरसेविका कोण, असा प्रश्न पडलेला आहे. नगरसेवकांकडे समस्या मांडण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मतदानासाठी पैसे दिल्याचे सांगून अक्षरशः त्यांना हाकलून लावले जाते. प्रभागात फ्लेक्सबाजीसाठी नगरसेवक हुकूमशहासारखे वागतात. ते वाटेल तिथे अनधिकृत फ्लेक्स लावतात. इतरांनी फ्लेक्स लावल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्यास भाग पाडले जाते. नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे समस्यांची तक्रार केल्यास ती कामे न करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले जातात, असे इच्छुकांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin