Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


वारकऱ्यांवर काळाचा घाला; ट्रक दरीत कोसळला


Main News

>> पाच जण ठार,  तर ४२ जखमी

पुणे, दि. २० (पीसीबी) - भीमाशंकरहून  दर्शन घेऊन परतताना तळेघर-मंदोशी घाटात वारकरी असलेला ट्रक दरीत कोसळला. या अपघातात पाच वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर ४२ जण जखमी झाले.

वाल्मीकी एकनाथ नागरगोजे (वय ६०), लक्ष्मण वामन नागरगोजे (वय ५५), नरहरी मोडवे अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर दोघा मृतांची नावे समजू शकली नाहीत. सर्व मृत हे लातूर जिल्ह्यातील रेणापुर गावातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लातूर जिल्ह्यातील रेणापुर तालुक्यातील वारकऱ्यांचा ट्रक देवदर्शनासाठी भीमाशंकर येथे आला होता. शुक्रवारी संध्याकाळी भीमाशंकरहून दर्शन घेऊन वारकऱ्यांचा ट्रक मंचरकडे जात होता. मंदोशी घाटात हा ट्रक आल्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक घाटात कोसळला.  60 या अपघातात पा वारकऱ्यांचा मृत्यु झाला तर ४२  वारकरी जखमी झाले आहेत.

 जखमींवर घोडेगाव रुग्णालयात तर काहींवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin