Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -बॅनर


पिंपरीतील तीन दिवसीय आरोग्य महाशिबिरात ३७ हजार ३४० रुग्णांची तपासणी


Main News

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचा आरोग्य विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाई प्रतिष्ठान आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आरोग्य महाशिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल ३७ हजार ३४० रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. डोळ्याच्या आजारांशी संबंधित ११ हजार, कान, नाक व घसा आजारांशी संबंधित २२००, कॅन्सर आजाराशी संबंधित २१००, हाडाच्या आजारांशी संबंधित ५ हजार, दातांच्या आजाराशी संबंधित ४ हजार ६०० रुग्णांचा समावेश होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख यांनी शुक्रवारी (दि. १९) दिली. 

 
आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून पिंपरी येथील एच. ए. मैदानावर तीन दिवसीय आरोग्य महाशिबिराचे आयोजन केले होते. बुधवारी (दि. १७) सुरू झालेल्या या आरोग्य महाशिबिराचा शुक्रवारी (दि. १९) समारोप झाला. समारोपाच्या दिवशी सिक्कीमचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी आरोग्य महाशिबिराला भेट दिली. गोरगरीब रुग्णांना सर्व रोगांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य महाशिबिराबद्दल राज्यपाल डॉ. पाटील यांनी आमदार जगताप यांच्या कार्याचे कौतुक केले. शिबिराच्या ठिकाणी फेरफटका मारून सहभागी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती त्यांनी घेतली. अशा प्रकारच्या आरोग्य महाशिबिराचे नेहमी आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक शंकर जगताप उपस्थित होते.
 
आमदार जगताप म्हणाले, “गोरगरीबांसाठी आयोजित केलेल्या या आरोग्य महाशिबिराला रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला. तीन दिवसांत तब्बल ३७ हजार ३४० रुग्णांची नोंदणी झाली. त्या सर्वांची शिबिरात सहभागी १७ रुग्णालयांचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. या शिबिरासाठी सर्व रुग्णालयांच्या व्यवस्थापनांनी चांगले सहकार्य केले. याशिवाय भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली. या सर्वांच्या बळावर हे शिबिर यशस्वी झाले आहे. शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य महाशिबिराला गोरगरीब रुग्णांनीही तेवढाच चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल पक्षाच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे.”
 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय देशमुख म्हणाले, “बुधवारपासून सुरू झालेल्या या आरोग्य महाशिबिरात ३७ हजार ३४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. १ हजार ६०० ह्दयरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. डोळ्याचे आजार झालेल्या तब्बल ११ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर जागेवरच उपचार करून त्यापैकी ५ हजार ५०० रुग्णांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले. कान, नाक व घसा याच्याशी संबंधित आजार असलेल्या २ हजार २०० रुग्णांची तपासणी करून पवना हॉस्पिटलच्या वतीने ३०० रुग्णांना श्रवणयंत्र मोफत वाटण्यात आले. दाताचे आजार झालेल्या ४ हजार ६०० रुग्णांची, हाडांच्या आजारांशी संबंधित ५ हजार ६० रुग्णांची, त्वचाविकार झालेल्या २ हजार २०० रुग्णांची, स्त्रीरोग व कॅन्सरसदृश्य आजार झालेल्या २ हजार १०० रुग्णांची प्रामुख्याने तपासणी करण्यात आली.”

ते म्हणाले, “या शिबिरात १ हजार ६०० रुग्णांची ह्दय तपासणी करण्यात आली. त्यापैकी २५ रुग्णांवर पवना आणि रुबी हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय ५० अपंगांना जयपूर फूट, ५ रुग्णांना व्हिलचेअर, ५ रुग्णांना वॉकर, ५ रुग्णांना क्रचस वाटप करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शिबिरात मोठा आजार आढळून आलेल्या रुग्णांना संबंधित हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. अशा सर्व रुग्णांना उपचारासाठी त्या त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. या आरोग्य महाशिबिरामुळे आजारांवर उपचार करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढल्याचे ते म्हणाले.”  

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin